🕒 1 min read
पटना- लोकसंख्या वाढल्याने लोक रोजगाराच्या शोधात वेगवेगळ्या शहरांकडे वळू लागले. नोकरीच्या संधी कमी झाल्याने बेरोजगारी वाढूही लागली. परिणामी गरिबीमध्येही झपाट्याने वाढ होऊ लागली. साधनसंपत्तीची कमतरता भासू लागली.अश्या कित्येक समस्यांचे मूळ हे वाढती लोकसंख्या आहे मात्र काही महाभागांना आजही लोकसंख्या वाढविणे हे मर्दानगीचे काम आहे असे वाटते आहे.
पुरुषाची मर्दानगी हा देशाचा विकास आणि राज्याच्या विकासापेक्षा मोठा मुद्दा आहे काय? हा प्रश्न उपस्थित केल्यावर अनेकांना आश्चर्य वाटेल. तुम्ही असा देखील विचार केला असेल की आम्ही हा विचित्र प्रश्न का विचारत आहोत. हे समजून घेण्यासाठी आम्ही तुम्हाला बिहारची राजधानी पटना येथे घेऊन जातो. येथे विधानसभेत प्रजनन दराच्या मुद्दय़ावरील चर्चेत केलेल्या एका वक्तव्याने खळबळ उडाली आहे.
वाढत्या लोकसंख्येबाबत चिंता व्यक्त करताना सत्ताधारी भाजपचे आमदार हरिभूषण ठाकूर म्हणाले की,एका विशिष्ट धर्मातील लोक लोकसंख्या वाढवित आहे. भाजप आमदाराच्या या वक्तव्यानंतर असदुद्दीन ओवैसी यांचा पक्ष एआयएमआयएमचे आमदार अख्तरुल इमान आणि त्यांनी वादग्रस्त विधान केले.
ते म्हणाले की, ‘लोकसंख्या वाढ हे मर्दानगीचे काम आहे ज्याच्यामध्ये दम असेल ते वाढवू शकतात.वाढलेली लोकसंख्या कधीही हानी पोहोचत नाही, ‘इमान म्हणाले,’ भारत हा खूप मोठा देश आहे, प्रत्येकाला इथे जगण्याचे स्वातंत्र्य आहे. असे काही लोक आहेत ज्यांना वातावरण खराब करायचे आहे, परंतु हे शक्य नाही.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षांपूर्वी लाल किल्ल्यावरून भाषण करताना लोकसंख्या वाढीचा मुद्दा उपस्थित केला होता. तेव्हा पंतप्रधान मोदींनी वाढती लोकसंख्या ही देशासाठी एक संकट असल्याचे त्यांनी सांगितले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- सामाजिक बांधिलकी! धनंजय मुंडेंकडून ‘त्या’ चिमुकलीचा पहिला वाढदिवस साजरा
- मंगलाष्टके नव्हे तर ‘वंदे मातरम्’च्या सुरात जुळल्या अनाथांच्या रेशीमगाठी
- ‘आ.संदिप क्षीरसागरांनी काकांच्या कामाचे श्रेय लाटले’
- जिल्हा मध्यवर्ती बँकासह सहकारी संस्थाच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर
- बीडमध्ये दहावी, बारावी वगळता सर्व शाळा बंद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
