🕒 1 min read
अहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. या सामन्यातील दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे या जोडीने 3 बाद 99 धावांपासून दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली होती. मात्र, रहाणे, शर्मा पाठोपाठ एक-एक खेळाडू चांगली कामगिरी न करताच परतले.
रिषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल यांना फारशी चांगली कामगिरी करता अली नाही. यानंतर,आर. अश्विनने ३२ चेंडूत १७ धावा काढल्या. मात्र, जो रूटच्या षटकात क्रोलीने अश्विनचा झेल घेत त्याला बाद केले. यानंतर, बुमराहला देखील केवळ १ धाव काढली. जो रुटने आपल्या फिरकीच्या जोरावर भारताला १४५ धावांवर रोखण्यात मोठं योगदान दिलं. रुटने ५ बळी घेतले आहेत.
W, 0, W! ????????@akshar2026 narrowly misses out on a hat-trick but what a start this has been for the local boy! ????????@Paytm #INDvENG #TeamIndia #PinkBallTest
Follow the match ???? https://t.co/9HjQB6TZyX pic.twitter.com/00HrgvVyzv
— BCCI (@BCCI) February 25, 2021
इंग्लंडच्या दुसऱ्या डावाला सुरवात झाली असून अक्षर पटेलच्या फिरकीची कमाल आज देखील पुन्हा दिसली आहे. या डावाचा पहिल्याच षटकात अक्षरने इंग्लंडच्या दोन खेळाडूंना खातेही उघडी न देता माघारी धाडलं आहे. सलामीवीर झॅक क्रोली आणि फलंदाज जॉनी बेअरस्ट्रो यांचा बळी अक्षरने घेतला आहे. त्यामुळे इंग्लंडला मोठा धक्का बसला असून भारतासाठी ही चांगली बाब आहे. दरम्यान, पहिल्या डावात देखील अक्षर पटेलने तब्बल ६ बळी पटकावले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- वडिलांच्या आठवणीत गोपीनाथ गडावर प्रितम मुंडेंकडून फुलांची आरास
- धनंजय मुंडेंनी त्यांच्या प्रकरणात नेमकी काय सेटलमेंट केली, हे त्यांनाच ठाऊक : निलेश राणे
- पिंक बॉल टेस्टमध्ये रो’हिट’चा विक्रम!
- लाॅकडाऊनची सर्वसामान्यांनी घेतली धास्ती, जीवनावश्यक वस्तूंची होतेय चढ्या दराने विक्री
- ‘आ.संदिप क्षीरसागरांनी काकांच्या कामाचे श्रेय लाटले’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
