Share

यूएईतून मायदेशी परतताना विमानतळावर पांड्याची तीन तासांहून अधिक काळ चौकशी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2020) स्पर्धेत मंगळवारी झालेल्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 5 विकेट्सने पराभव केला आणि पाचव्यांदा आयपीएल स्पर्धा जिंकली. मुंबई इंडियन्सने तब्बल पाचव्यांदा आयपीएलच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे.

दुबई येथे चालू असलेल्याआयपीएल मधील उत्तम कामगिरी करून मायदेशात परतलेल्या मुंबई इंडियन्सच्या टीम मधील प्रमुख खेळाडू कृणाल पांड्या  याला गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल संचलनालय यंत्रणेकडू अडवण्यात आले.

कृणालनं UAEतून परतताना नियमापेक्षा अधिक सोनं व महागडी घड्याळं आणली आणि त्याची कोणतीच माहिती विमानतळावरील महसूल संचलनालयाला दिली नाही. संचलनालयाला मिळालेल्या टीपनूसार ही कारवाई झाली आणि 29 वर्षीय पांड्याला अडवण्यात आले.

त्याच्याकडे डायमंडची दोन आणि Rolex Modelsची दोन अशी एकूण चार महागडी घड्याळं सापडली आणि त्याची माहिती त्यानं महसूल विभागाला दिली नव्हती. या घड्याळ्यांची किमंत ही जवळपास 1 कोटीच्या घरात जाते. चार्टड फ्लाईटनं सायंकाळी 4.30 वाजला मुंबईत दाखल झालेल्या पांड्याची तीन तासांहून अधिक काळ चौकशी केली गेली.

घड्याळं जप्त करूनत त्याला घरी जाण्याची परवानगी देण्यात आली.”मुंबई विमानतळाच्या कस्टम्स विभागाकडे हे प्रकरण व ती घड्याळं सुपूर्द करण्यात आली आहेत. आता पांड्याला त्यावरील कर आणि दंड भरावा लागेल,”अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!