टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे आता शेवटचे तीन टप्पे राहिले आहेत त्यामुळे भाजप कडून सत्ता अबाधित ठेवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. भाजपच्या अनेक नेत्यांनी कंबर कसून प्रचाराचा धडाका लावला आहे. तर या प्रचार सभांमधून पाकिस्तानला विशेष लक्ष केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात पाकिस्तानच्या गोळीला भारताच्या तोफेने प्रत्युत्तर मिळेल, असा इशारा अमित शाह यांनी मध्यप्रदेश येथील प्रचार सभेमध्ये दिला आहे.
यावेळी अमित शाह म्हणाले की, सुरक्षेसंबंधी मोदी सरकारची भूमिका पूर्णपणे वेगळी असून जशास तसे उत्तर देण्याची ताकद आताच्या नरेंद्र मोदी सरकारमध्ये आहे. भारत आता गप्प बसणारा देश नसून, घुसून कारवाई करणारा देश आहे. तसेच दहशतवाद्यांनी भारतीय जवानांचा शिरछेद केला होता. पण त्यावेळी मनमोहन सिंग यांच्या सरकारने काहीही कारवाई केली नाही, मात्र मोदींच्या काळात दहशतवाद्यांनी पुलवामा येथे हल्ला केला. त्याला उत्तर म्हणून नरेंद्र मोदींनी बालाकोटमध्ये हवाई हल्ला करत दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केले. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारमध्ये जशास तसे उत्तर देण्याची ताकद आहे.


