Share

ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूला पाकिस्तानी चाहते म्हणाले “अपना ही घर समझो”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: ऑस्ट्रेलियाचा संघ २४ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर पाकिस्तान दौऱ्यावर आला आहे. याबाबत जगभरात चर्चा सुरू आहे. ज्यात ऑस्ट्रेलिया संघाचा भाग असलेला पाकिस्तानी वंशाचा उस्मान ख्वाजा प्रदीर्घ काळानंतर पाकिस्तानात परतला आहे. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. ज्यामध्ये उस्मान ख्वाजाही खेळत आहे. अशा स्थितीत पाकिस्तानी चाहत्यांनी ख्वाजाचे अतिशय चांगल्या पद्धतीने स्वागत केले आहे.

ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात रावळपिंडीच्या मैदानावर ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उस्मान ख्वाजाचे पाकिस्तानी चाहत्यांनी जोरदार स्वागत केले आहे. पाकिस्तानी वंशाचा उस्मान ख्वाजा (usman khawaja)याने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले असून तो प्रदीर्घ काळानंतर मायदेशी परतला आहे. पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान काही पाकिस्तानी चाहते स्टँडवर काही पोस्टर घेऊन उभे होते, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियन संघाच्या (cricket australia) खेळाडूंचे पाकिस्तानात आल्याबद्दल आभार मानले जात होते. पण त्यातील एक पोस्टर उस्मान ख्वाजाचेही होते, ज्यावर लिहिले होते, “उस्मान ख्वाजा अपना ही घर समझो” (उस्मान ख्वाजा याला स्वतःचे घर समज) हे पोस्टर सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.


https://www.instagram.com/p/CarVNnJscs6/?utm_source=ig_web_copy_link

उस्मान ख्वाजा मूळचा इस्लामाबाद, पाकिस्तानचा आहे, जो रावळपिंडीपासून ३० किमी अंतरावर आहे. विशेष म्हणजे रावळपिंडीच्या मैदानावर उपस्थित पाकिस्तानी चाहत्यांनी आपल्या देशाच्या या ऑस्ट्रेलियन खेळाडूचे इतके छान स्वागत केले की सगळेच त्यांचे कौतुक करत आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!