🕒 1 min read
मुंबई : माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्यावर बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याचा आरोप असून त्यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शालेय शिक्षण राज्य मंत्री बच्चु कडू, आशिष देशमुख व संजय काकडे यांचे तब्बल साठ दिवस फोन टॅप केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. असे असतांनाच आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गोव्यातदेखील फोन टॅपिंगचा महाराष्ट्र पॅटर्न सुरु असल्याचा खळबळजनक खुलासा केला आहे. तसेच गोव्यातील रश्मी शुक्ला कोण?, असा सवालही राऊतांनी केला आहे.
यासंदर्भात संजय राऊत यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘गोव्यात फोन टॅपिंग चा महाराष्ट्र पॅटर्न. सुदिन ढवळीकर,विजय सरदेसाई, दिगंबर कामत, गिरीश चोडणकर यांचे फोन टॅपिंग सुरू आहे.’ तसेच गोव्यातील रश्मी शुक्ला कोण?, असा सवालही त्यांनी केला आहे.
गोव्यात फोन टॅपिंग चा महाराष्ट्र पॅटर्न.
सुदिन ढवळीकर,विजय सरदेसाई दिगंबर कामत गिरीश चोडणकर… यांचे फोन टॅपिंग सुरू आहे …
गोव्यातील रश्मी शुक्ला कोण?— Sanjay Raut (@rautsanjay61) March 5, 2022
दरम्यान, रश्मी शुक्ला यांच्यावर बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याचा आरोप असून यासंदर्भात तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांची समिती नेमण्यात आली होती. याच समितीने राज्य शासनाला अहवाल दिल्यानंतर शासनाने दिलेल्या आदेशानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच नाना पटोले, बच्चु कडू, आशिष देशमुख आणि संजय काकडे यांचे साठ दिवस फोन टॅप केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Russia-Ukraine war : “…तर युरोप सुध्दा टिकणार नाही”, झेलेन्स्की यांचा धक्कादायक दावा
- IND vs SL: पहिल्या सामन्यात असे काय झाले कि ऋषभ पंत रडकुंडीला आला ; व्हिडीओ होतोय व्हायरल
- नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ; जाणून घ्या काय आहे कारण
- Disha Salian Case : “खेळ तुम्ही सुरु केला पण…”, नितेश राणेंचा ट्वीट करत इशारा
- OBC Reservation : प्रभाग रचनेसह सर्व प्रक्रिया स्वत:कडे घेण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
