नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फिरकी गोलंदाज शेन वॉर्नच्या निधनाची बातमी ऐकून संपूर्ण क्रिकेट विश्व हैराण झाले आहे. अशातच शेन वॉर्नचा प्रतिस्पर्धी मुथैया मुरलीधरनने आपली प्रतिक्रया दिली आहे. मुरलीधरन म्हणाला की, वॉर्नने फिरकी गोलंदाजीत आपली एक वेगळीच छाप निर्माण केली होती.
इंडिया टुडे, बरोबर बोलताना मुरलीधरनने एक आश्चर्यकारक गोष्ट सांगितली आहे. म्हणाला,” मला काय बोलावे हे कळत नाही. तो एक माझा चांगला मित्र आणि एक महान क्रिकेटरही होता. त्याने स्पिन गोलंदाजीसाठी जे काही केले आहे. ते न विसरण्यासारखे आहे. तो इतिहासातील महानायक म्हणून सर्वांच्या स्मरणात राहील. हे त्याचे जाण्याचे वय नव्हते. जेव्हा ही कधी मी त्याला पहिले तेव्हा तो खूप फीट असयचा. हे संपूर्ण क्रिकेट विश्वासाठी मोठे दु:ख आहे.
मुरीलीधरण पुढे म्हणाला की, मी त्याला १९९२ मध्ये पहिल्यांदा पहिले होते. तेव्हा त्याने कठीण परीस्थितीतून ऑस्ट्रेलिया संघाला विजय मिळवून दिला होता. त्यावेळी माझ्या मनात विचार आल होता की हा खूप मोठा गोलंदाज बनणार आहे.”
शेन वॉर्न कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त विकेट घेणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर मुरलीधरन पहिल्या क्रमांकावर. वॉर्नने आपल्या फिरकीवर भल्याभल्या फलंदाजांना नाचवले आहे. परंतु शुक्रवारी (४ मार्च) वयाच्या ५२ व्या वर्षी हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचा थायलंड येथे आकस्मित निधन झाले .
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

