🕒 1 min read
मुंबई : पाकिस्तानी कॉमेडियन उमर शरीफ यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ६६व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते काही आजरांचा सामना करत होते. आज २ ऑक्टोबर रोजी त्यांनी जर्मनीमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर कॉमेडियन कपिल शर्माने सोशल मीडिया पोस्टद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे.
दरम्यान २८ सप्टेंबर रोजी उमर शरीफ यांची प्रकृती खालावली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी सर्वजण प्रार्थना करत होते. मात्र २ ऑक्टोबर रोजी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. उमर शरीफ हे पाकिस्तानमधील अतिशय लोकप्रिय कॉमेडियन, अभिनेते आणि निर्माते होते.
कपिल शर्माने ट्विटर अकाऊंटवर उमर शरीफ यांचा फोटो शेअर करत ‘भावपूर्ण श्रद्धांजली, देव तुमच्या आत्म्याला शांति देवो’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे. त्यानंतर जर्मनीतील पाकिस्तानचे राजदूत मोहम्मद फैसल यांनी उमर शरीफ यांच्या निधनाची माहिती देत म्हटले की,’मला सांगताना अतिशय दु:ख होत आहे उमर शरीफ यांचे जर्मनीमध्ये निधन झाले आहे.’ यानिमित्त सोशल मीडियावर अनेकांनी श्रध्दांजली वाहिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘फडणवीसांनी दिल्लीतून मदत आणावी, त्यांना शाब्बासकी मिळेल’ पटोलेंचा टोला
- धर्मांतरण प्रकरणात उत्तर प्रदेश ATS ने केली यवतमाळच्या धीरज जगतापला अटक
- ‘इंदिरा गांधींसारखे नेतृत्व असते तर..’, पंजाबमधील राजकीय घडामोडींवर शिवसेनेची भूमिका
- ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी झाला खुला, पर्यटकांनी भरभरून दिला प्रतिसाद
- ‘विश्वास नांगरे पाटलांवर आरोप करून बदनाम करत असाल तर रस्त्यावर उतरू’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
