🕒 1 min read
नवी दिल्ली : पाकिस्तानचा उपकर्णधार शादाब खान (Shadab Khan) ने आपला कर्णधार बाबर आजमचे (Babar Azam) जोरदार कौतुक केले आहे. कर्णधार बाबर आजमसाठी खेळाडू जीवही देतील, असेही शादाब खानने म्हटले आहे. या अष्टपैलू खेळाडूने संघाला प्रेरित करण्याचे संपूर्ण श्रेय कर्णधार बाबर आजमला दिले आहे. बाबर आजम यांच्या वागणुकीबद्दलही त्यांनी बोलले आहे.
एका वृत्ताशी सवांद साधत असताना शादाब खान म्हणाले की, बाबर आजमम जे निर्णय घेत आहेत, त्यावरून तो एक प्रभावशाली नेता असल्याचे सूचित करतो. आजमच्या नेतृत्वाखाली प्रत्येक खेळाडू चांगली कामगिरी करत असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे. खेळाडूंच्या पाठिंब्यासाठी सदैव तत्पर असलेल्या नेत्यासाठी लोक आपला जीव द्यायला तयार असतात.
UAE मध्ये खेळल्या गेलेल्या T20 विश्वचषकाबद्दल बोलताना शादाब खान म्हणाले की, पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पराभूत झाला असेल, पण या मेगा स्पर्धेतून संघाला खूप काही शिकायला मिळाले. पाकिस्तानी संघाच्या सराव सत्रात राष्ट्रध्वज लावण्याच्या प्रश्नावर शादाबने सांगितले की, हा निर्णय संघाचे प्रशिक्षक सकलेन मुश्ताक यांनी घेतला आहे. देशासाठी आपल्याला मनापासून खेळायचे आहे, याची आठवण करून देते हा ध्वज आपल्याला एकत्र करतो.
महत्वाच्या बातम्या
- निवडणुकांमधील पराभवाच्या भितीमुळेच सरकारने माघार घेतली- संजय राऊत
- आपण काय बोलतो याचं जरा भान ठेवलं पाहिजे; अजित पवारांचा आशिष शेलारांना टोला
- ३७८ दिवस अशा पद्धतीने चाललेला लढा जगात दुसरा झाला नसेल- संजय राऊत
- ‘सरकार फक्त मेकअप व रंगसफेदी करीत असून प्रत्यक्षातले चित्र भेसूर’
- भाजपने ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्याच्या राजीनाम्याची केली मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
