Share

PAK vs AUS: अबब! ५६ चौकार आणि १८ षटकार.. पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेत मिळवला ऐतिहासिक विजय

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: पाकिस्तान संघाने त्यांच्या होम ग्राऊंडवर खेळल्या जात असलेल्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दणदणीत विजय नोंदवत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. या मालिकेत पाहुण्या ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या सामन्यात विजयाने सुरुवात केली होती. मात्र लाहोरमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात यजमान पाकिस्तान संघाने पाठलाग करताना केवळ मोठी धावसंख्याच गाठली नाही तर संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला आहे.

या सामन्यात कांगारू संघाने प्रथम फलंदाजी करताना ३४९ धावांचे डोंगरासारखे लक्ष्य ठेवले होते. याला प्रत्युत्तर देताना पाकिस्तान (PAK vs AUS) संघाला पुन्हा एकदा बाबर आझम (Babar azam) आणि इमाम-उल-हक (imam-ul-haq) यांची साथ लाभली. या दोघांच्या फलंदाजीसमोर कांगारू गोलंदाज हतबल दिसत होते. या सामन्यात बेन मॅकडरमॉटने ऑस्ट्रेलियासाठी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. त्याचवेळी सलामीवीर ट्रॅव्हिस हेडच्या ८९ धावांच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने ८ बाद ३४८ धावा केल्या होत्या.

३४९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाहुण्या संघाला फखर जमानच्या रूपाने पहिला धक्का बसला. पण, विकेट गमावण्यापूर्वी फखरने ६७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. येथून इमाम-उल-हकने कर्णधार बाबर आझमसह संघाची कमान हाती घेतली आणि धडाकेबाज खेळी केली. बाबर आझम ११४ आणि इमामने 106 धावा केल्या. दोघांच्या या स्फोटक खेळीमुळे पाकिस्तानने ४९ षटकांत ४ बाद ३५२ धावा करत हे लक्ष्य गाठले. या सामन्यात दोन्ही संघांनी मिळून एकूण ६९७ धावा केल्या. यासह दोन्ही संघाकडून फलंदाजांनी १८ षटकार आणि ५६ चौकार लगावले. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने १० षटकार आणि ३० चौकार लगावले. तर पाकिस्तान संघाकडून ८ षटकार आणि २४ चौकार होते. ज्यामुळे हा सामना ऐतिहासिक ठरला.

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!