🕒 1 min read
मुंबई: IPL 2022 ची ९ वी लढत शनिवारी MI विरुद्ध RR यांच्यात होणार आहे. पण, त्याआधी लसिथ मलिंगाचा मुंबईच्या खेळाडूंसोबतचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या हंगामात श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज राजस्थान रॉयल्सशी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून जोडला गेला आहे. एका फेरीत आपल्या घातक गोलंदाजीने फलंदाजांना हादरवणाऱ्या लसिथ मलिंगाने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. सध्या तो त्याच्या फ्रँचायझीशी जोडला गेला असला तरी त्याचा सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराहसोबतचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव राजस्थान रॉयल्सने (RR) शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये लसिथ मलिंगासोबत (Lasith malinga) गप्पा मारताना दिसत आहेत. हे दोन्ही खेळाडू त्याच्यासोबत मस्तीच्या मूडमध्ये दिसले. यादरम्यान सूर्या (suryakumar yadav) सांगतो की, राजस्थान रॉयल्सचा ट्रेंट बोल्ट (trent boult) मलिंगाकडून काही गोष्टी कशा शिकला.या संभाषणात बुमराहनेही (jaspreet bumrah) हस्तक्षेप केला आणि सांगितले की, डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने रॉयल्सच्या पहिल्या सामन्यात अनेक यॉर्कर चेंडू टाकले.
दुखापतीतून सावरल्यानंतर सुर्या नुकताच मुंबईत दाखल झाला आणि सामन्यापूर्वी तो मस्ती करताना दिसला. व्हिडिओमध्ये सूर्या म्हणाला, ‘मी बोल्टला तुमच्याकडून काही युक्त्या शिकताना पाहिलं आहे.’ यावर प्रशिक्षक मजेशीरपणे उत्तर लसिथ मलिंगा म्हणाला, ‘म्हणूनच आम्ही त्याला गोलंदाज म्हणतो. तो लेन्थ बॉल टाकू शकतो. तो यॉर्कर्स करू शकतो. जर तो स्लो टाकू शकतो, तर तो बाउन्सरही टाकू शकतो. हा एक गोलंदाज आहे. एक स्टाईल असलेला गोलंदाज म्हणून तुम्ही ते केलेच पाहिजे.’
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- जगात सर्वात जास्त तापमान अकोल्यातचं का?
- मोदी सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार राहिलेला नाही- बाळासाहेब थोरात
- CNG आणि PNG गॅसच्या दरांत झाली घट; अजित पवारांची माहिती
- IPL 2022: अरेरे! ‘बेबी एबी’ आयुष बदोनीच्या षटकाराने स्टॅन्डमधील महिला प्रेक्षक घायाळ
- “पाकीटमारीत तर तुमची PHD असेल”, संजय राऊतांच्या टीकेवर निलेश राणेंचे प्रत्युत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
