Share

IPL 2022: अजय जडेजाचे धोनीसंबधी मोठे वक्तव्य; म्हणाला ‘ त्याने जडेजा ऐवजी निर्णय घेणे थांबवावे’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: IPL 2022 ला सुरुवात झाली आहे पण, CSK ला अजूनही स्पर्धेत विजय मिळवता आला नाहीये. आतापर्यंत नाव कर्णधार रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने या मोसमात २ सामने खेळले असून या दोन्ही सामन्यांमध्ये संघाला चांगलाच फटका बसला आहे. आतापर्यंतचा हा मोसम चेन्नईच्या चाहत्यांसाठी निराशाजनक राहिला आहे. यावर्षी आयपीएल सुरू होण्यापूर्वीच सीएसकेने त्यांच्या नवीन कर्णधाराची घोषणा केली होती.

एमएस धोनी (MS Dhoni) कर्णधारपदावरून दूर गेल्यानंतर रवींद्र जडेजाच्या (Ravindra jadeja) नेतृत्वाखाली संघाची अशी सुरुवात होईल, असे कुणालाही वाटले नसेल. गेल्या सामन्यातही बरेचसे निर्णय जडेजा ऐवजी धोनी करताना दिसला. अशा परिस्थितीत, सगळ्यांना प्रश्न असा पडत आहे की जड्डू केवळ ऑन पेपर संघाचा कर्णधार आहे का ? याच मुद्द्यावर माजी खेळाडू अजय जडेजा (ajay jadeja) यांनीही धोनीवर निशाणा साधला आहे.

अजय जडेजा म्हणाले ,“हा शेवटचा लीग सामना असता आणि धोनी कर्णधार म्हणून निर्णय घेत असता तर बरे झाले असते. पण या मोसमातील हा फक्त दुसरा सामना होता. धोनी हा मोठा खेळाडू आहे आणि मी त्याचा सर्वात मोठा चाहता आहे, पण एक चाहता म्हणूनही मला तो आवडला नाही. जर नवीन नेता घडवायचा असेल तर तुम्हाला त्यांना स्वातंत्र्य द्यावे लागेल, जडेजाला नेतृत्व करण्याची परवानगी दिली तरच तो कर्णधार होऊ शकतो. जेव्हा तो चुका करतो तेव्हाच तो शिकतो” जडेजाच्या या मताला अनेक चाहत्यांनी समर्थन दिले आहे.

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!