Share

PAK vs AUS : लोच्या झाला रे..!रावळपिंडी पिचवर १००० धावांचा वर्षाव; तरीही ICCनं घेतला ‘असा’ निर्णय!

Published On: 

मुंबई: पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेला पहिला कसोटी सामना ड्रॉ झाल्यानंतर संघांवर मोठी टीका झाली होती. आता यात भर म्हणून ICC ने गुरुवारी रावळपिंडी येथील रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटीसाठी वापरण्यात आलेल्या खेळपट्टीला “सरासरीपेक्षा कमी” असे रेट केले आहे. आयसीसी खेळपट्टी आणि आऊटफिल्ड मॉनिटरिंग प्रक्रियेअंतर्गत या ठिकाणाला डिमेरिट पॉइंट देखील मिळाला आहे.

झालेल्या सामन्याबाबत एमिरेट्स ICC एलिट पॅनेल ऑफ मॅच रेफरीचे रंजन मदुगले यांनी अधिकृत निवेदनात सांगितले की, “पाच दिवसांच्या कालावधीत खेळपट्टीचे स्वरूप फार बदलले नाही आणि बाऊन्स किंचित कमी होण्याशिवाय काहीही बदल झाले नाही. खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांसाठी फारसा वेग आणि बाऊन्स नव्हता किंवा फिरकीपटूंनाही फायदा झाला नाही. माझ्या मते, ही बॅट आणि बॉलमधील समान स्पर्धा दर्शवत नाही. म्हणून, आयसीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, मी या खेळपट्टीला सरासरीपेक्षा कमी रेट करतो.”

ऑस्ट्रलिया आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटीत पाच दिवसांच्या कालावधीत सामना अनिर्णित राहिल्याने केवळ तीन डाव खेळले गेले. पाकिस्तानचे सलामीवीर इमाम-उल-हक आणि अब्दुल्ला शफीक यांनी नाबाद शतके झळकावल्यामुळे पाकिस्तानने पाचव्या आणि शेवटच्या दिवशी एकही विकेट न गमावता २५२ धावा केल्या. पहिल्या कसोटीत १००० पेक्षा जास्त धावा होऊन सुद्धा सामना अनिर्णित राहिल्याने क्रिकेटरसिक निराश झालेले दिसले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!