औरंगाबाद : लाॅक डाऊन काळामध्ये पैठण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कुठल्याही प्रकारची दारू विक्री करण्यात येणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी आदेश देण्यात आल्यानुसार पैठण पोलिसांनी भिंगरी दारू शहरामध्ये विक्री करण्यासाठी घेऊन येणाऱ्या दोन आरोपींना अटक करून ३ लाख २१ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पैठण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये व शहरांमध्ये कुठल्या प्रकारचे अवैद्य दारू विक्री करताना आढळल्यास तात्काळ कारवाई करण्यासाठी उपविभागीय पोलिस गोरख भाबरे व पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी धडक मोहीम हाती घेतली असून बुधवारी रोजी पैठण शहरामध्ये शेवगाव येथून भिंगरी दारू विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली.
पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सागडे, पो.ना. करणार सिंग, सिंगल, पोका समाधान भागिले, अरुण जाधव, यांनी मौजे घारी शिवारात शेवगाव येथून भिंगरी दारू घेऊन येणाऱ्या गणेश बाबुराव नाटकर, नितेश बडसल दोघेही राहणार राहुल नगर तालुका पैठण यांनी छोटा हत्ती मधून सात बाॅक्स वाहतूक करीत असल्याने अटक केली आहे त्यांच्या ताब्यातून २१ हजार रुपयाची दारू व ३ कृपया छोटा हत्ती वाहन मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- नगरला येणारा ऑक्सिजन टँकर पुण्यात अडवला, वेगळ्या भाषेचा उपयोग केल्यानंतर सोडला – थोरात
- घाटीच्या सुपर स्पेशालिटी इमारतीमध्ये ऑक्सिजन टँक बसवला
- संचारबंदीत नाथ घाट परिसरात फटफटी गँगचा धुमाकूळ!
- कोरोनामुळे झालेले मृत्यू म्हणजे केंद्र आणि राज्य शासनाने केलेली हत्या- खासदार जलील
- सुनेच्या खून प्रकरणी सासू-सासऱ्याला तीन महिन्यानंतर अटक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

