Share

सीएम रिलीफ फंडात बाळासाहेब थोरात एक वर्षाचं तर काँग्रेस आमदार देणार एक महिन्याचे मानधन

Published On: 

मुंबई : देशात १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील सर्वांसाठी देखील लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. अशातच अनेक ठिकाणी लसींचा तुटवडा निर्माण होत असून आता सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या कंपन्यांनी लसींचे नवे दर जाहीर केले आहेत. आधीच आर्थिक पेचात असलेले नागरिक नव्या किंमतींमुळे अधिक पेचात पडले असून लसीकरणामध्ये मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो.

राज्यात १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींचं सरसकट लसीकरण केलं जाणार आहे. तब्बल ५ कोटी ७१ लाख जनतेचं मोफत लसीकरण केलं जाणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. लसीकरणात दोन्ही डोस मोफत दिले जाणार आहेत. यामुळे एकूण ११ कोटींहून अधिक डोस या मोहिमेतून दिले जाणार आहेत. तर, दुसरीकडे राज्याच्या तिजोरीवर सुमारे ६५०० कोटींचा अधिकचा भार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या सरकारच्या तिजोरीवर सध्या मोठा भार पडणार आहे. यामुळे महाराष्ट्र कॉंग्रेस कमिटीने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील कोरोनाचं वाढतं संकट आणि लसीकरणावर येणारा खर्च या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सर्व आमदारांनी त्यांचं एक महिन्याचं मानधन सीएम रिलीफ फंडात देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात एक वर्षाचं मानधन देणार आहेत. तसेच महाराष्ट्र काँग्रेसकडून सीएम रिलीफ फंडात ५ लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे, तशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. तसेच अमृत उद्योगातील पाच हजार कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा खर्चही सीएम रिलीफ फंडात देणार असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.

‘सर्वांचे मोफत लसीकरण झालं पाहिजे यासाठी आम्ही आग्रही आहोत. यापूर्वीचे लसीकरणही मोफत झालं आहे. त्यामुळे आम्हीही मोफत लसीकरण करणार आहोत. यावर मोठा खर्च येणार आहे. त्यामुळे मी माझं एक वर्षाचं मानधन मुख्यमंत्री सहायता निधीला देणार आहे. काँग्रेसचे सर्व आमदारही त्यांचं एक महिन्याचं मानधन मुख्यमंत्री सहायता निधीला देणार आहेत. तसेच महाराष्ट्र काँग्रेसच्यावतीने मुख्यमंत्री सहायता निधीला पाच लाख रुपये देण्यात येणार आहेत, तसेच सीएम रिलीफ फंडाला निधी देण्यासाठी नागरिकांनी पुढे यावं’ असं आवाहन थोरात यांनी केले आहे.

 

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!