🕒 1 min read
वाशिम : मागील अनेक महिन्यापासून कोरोनामुळे सगळे व्यवहार ठप्प होते. तसेच जनावराचे बाजार देखील बंद होते. मात्र आता हळूहळू बाजार सर्वत्र भरत आहेत. अशातच वाशिम जिल्ह्यातील राजा नावाचा बोकड सध्या चर्चेचा विषय बनला आहे. हा काही साधा बोकड नसून लाख मोलाचा बोकड आहे. या बोकडाची किंमत ऐकून भल्या भल्याची झोप उडाली आहे. या बोकडासाठी तब्बल 9 ते 10 लाख रुपये देण्यासाठी ग्राहक तयार आहेत. मात्र, या बोकडाच्या मालकाने ही ऑफर नाकारली आहे.
वाशिम तालुक्यातील तामसी येथील संतोष पैठणकर यांच्या शेळीने दीड वर्षांपूर्वी दोन पिल्लांना जन्म दिला. त्यापैकी राजा नावाच्या बोकडाच्या डोक्यावर जन्मतःच अर्धचंद्राची खूण आहे. त्यामुळे मुस्लिम धर्मामध्ये बकरी ईदला अशा बोकडाच्या कुर्बाणीला फार महत्त्व आहे. त्यामुळे या बोकडाची किंमत नक्कीच वाढणार असल्याने मालकाने या बोकडाची किंमत 20 लाख ठेवली आहे.
दरम्यान, सांगलीच्या आटपाडीतील जनावरांचा बाजार देखील प्रसिद्ध आहे. बाजारात मेंढ्या, जनावरांबरोबरच तब्बल दीड कोटी रुपये दर असलेला मोदी बकरा विक्रीसाठी आला होता. हा बकरा या बाजारातील उत्सुकतेचा विषय ठरला होता. त्या एका बोकडाची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- मोदी- ट्रम्प दोस्तीचे दुष्परिणाम आता भारताला भोगावे लागणार : कॉंग्रेस
- आणीबाणीतील बंद्यांना सहा महिन्यांचे थकीत पेन्शन आदा करा;न्यायालयाचा आदेश
- मराठा आरक्षणातील संवैधानिक बाबींवर केंद्राने सकारात्मक बाजू मांडावी;अशोक चव्हाण यांची मागणी
- नगरची व्हीआरडीई चेन्नईला हलविण्याच्या हालचाली, निलेश लंकेंनी घेतली पवारांची भेट
- उर्मिला मारतोंडकर यांच्यासह बॉलिवूड अभिनेत्रींनकडून चंद्रमुखी देवी यांचा निषेध


