Share

ओवैसींनी महाराष्ट्र दौरा सोडला अर्धवट ; वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते गेले गोंधळून 

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : सध्या देशामध्ये निवडणुकांचे वारे जोरदार वाहत आहे. अशातच मतदारांना प्रभावित करण्यासाठी जो तो पक्ष आपापल्या परीने प्रयत्न करतो आहे. अशातच राज्यात वंचित बहुजन आघाडीचे नेतृत्व करणाऱ्या असदउद्दीन ओवेसींनी महाराष्ट्र दौरा अर्धवट सोडला आहे. त्यामुळे ओवेसींच्या पुणे आणि बारामतीमधील सर्व सभा रद्द झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पुणे आणि बारामती लोकसभा मतदार संघात ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर अनेक ठिकाणी सभेला संबोधीत करणार होते. वंचित बहुजन आघाडीच्या या सभांची सुरुवात २० एप्रिलला खडकवासल्यातून होणार होती. मात्र, ओवेसी यांना काही वैयक्तिक कार्यक्रमात सहभागी व्हायचे होते. त्याप्रमाणेच पुणे आणि बारामतीत एमआयएमला खूप प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा नव्हती. त्यामुळे ओवेसी या दोन्ही मतदार संघात सभेला संबोधित करणार नाहीत, असे पुण्यातील एमआयएमच्या सूत्रांनी सांगितले आहे.

दरम्यान, बारामतीमधील खडकवासला आणि पुण्यातील सभेसाठी वंचित बहुजनच्या कार्यकर्त्यानी गेल्या अनेक दिवसांपासून तयारी केली होती. खडकवासल्याच्या सभेसाठी तर आंबेडकरांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थकांचा दावा असतानाही खूप मेहनत करून मैदान मिळवले होते. मात्र, सभेला ऐनवेळी मिळालेली परवानगी आणि ओवेसी सभेला न आल्यामुळे या सभेला खूप कमी प्रतिसाद मिळाला आहे. तर पुण्यात रविवारी दुपारी ओवेसी संबोधित करणार नसल्याच्या वृत्तामुळे कार्यकर्त्यांमध्ये गेल्या २  दिवसांपासून संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, तरीही ओवेसी किमान पुण्यातील रविवारच्या प्रचाराचा समारोप करण्यासाठी आयोजित सभेला उपस्थित राहावेत, यासाठी कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!