Share

जालन्यात तिघांची म्युकरमायकोसीसवर मात!

Published On: 

🕒 1 min read

जालना: कोरोना सोबतच आता नवीन आजाराची म्हणजेच म्युकरमायकोसीस हा जार सुद्धा वेगाने पसरत आहे. एक दिलासादायक बातमी अशी की म्युकरमायकोसीस या आजारावर जालन्यातील तिघांन मात केली असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र एका महिलेचा दुर्दैवाने मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच या आजारावर प्रभावी ठरणारे अॅम्फोटेरिसिन-बी इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने एका गंभीर रुग्णास दोन दिवसांपूर्वीच औरंगाबादला रेफर केले आहे.

या आजारात उपचारासाठी लागणाऱ्या औषधींचा तुटवडा असल्यामुळे काही रुग्ण औरंगाबाद, पुणेला उपचार घेण्यासाठी जावे लागत आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयात ५० अॅम्फोटेरिसिन इंजेक्शन आले होते, त्यापैकी १३ इंजेक्शन वापरले असून ३७ शिल्लक आहे. दीपक हॉस्पिटलनेही बंगळुरूहून २५ इंजेक्शन मागवून रुग्णांना दिले. यामुळे रुग्णांची प्रकृती स्थिर असली तरी पुढील उपचारात अॅम्फोटेरिसिन इंजेक्शनची मोठी गरज भासणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.

दीपक हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या १७ रुग्णांपैकी तिघांनी म्यूकरमायकोसिसवर यशस्वी मात केली असून एका महिलेचा मृत्यू झाला. या उपचारात महत्त्वाची भूमिका असलेले अॅम्फोटेरिसिन इंजेक्शन स्थानिक पातळीवर मिळत नसल्याने परजिल्ह्यासह, परराज्यातून आणून रुग्णांवर उपचार करण्यात आले, यामुळे रुग्णांची प्रकृती स्थिर राहिली. सध्या १२ रुग्णांवर दीपक हॉस्पिटल तर दोन रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!