मुंबई : राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. लखीमपूर हिंसाचारात ४ शेतकऱ्यांसह ८ जणांचा मृत्यू झाला. या घटनेचा निषेध म्हणून महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. ‘भारत सरकारनं शेतकऱ्यांना न्याय द्यायला हवा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे या हुतात्मा चौकात आल्या होत्या. याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रवक्ते नवाब मलिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी त्यांनी ही घाणाघाती टीका केली.
त्या म्हणाल्या, लखीमपूरच्या हिंसेच्या विरोधात आम्ही हा बंद पुकारला आहे. शेतकऱ्यांना चिरडले जाते हे दुर्देव आहे. माणुसकी राहिली नाही. पूर्वी राजकारणात माणुसकी होती. केंद्राने ही माणुसकी संपवली आहे. शेतकऱ्यांचा खून केला आहे. त्याचा निषेध म्हणून हा बंद पुकारण्यात आला आहे. शेतकऱ्यांना चिरडण्यात येत असल्याचा व्हिडीओ पाहिला. सत्तेची मस्ती आहे. तुम्ही तो व्हिडीओ बघा. यात माणुसकी दिसते. ही क्रूरता आहे. उत्तर प्रदेशातील घटना अत्यंत चुकीची आहे. नैतिक जबाबदारी घेऊन केंद्रातील मंत्र्याने राजीनामा द्यावा, अशी मागणीही खा. सुळे यांनी केली.
अनिल देशमुख यांच्या सुनेविरोधात अटक वॉरंट जारी केलंय. त्यावरही सुप्रिया सुळे यांनी केंद्रावर जोरदार हल्ला चढवला. “केंद्र सरकार मुघलांचं आहे. छत्रपतींच्या राज्यात कधी कोणी महिलांवर हात उचलला नाही. छत्रपतींनी महिलांचा नेहमी मानसन्मानच केलाय. या मोघलांच्या राज्यात महिलांवरील अत्याचाराचा इतिहास आपल्या देशाने पाहिलाय. हे मुघलांचं राज्य सुरू आहे आणि त्यांच्या संस्कृतीत महिलांचा सन्मान दिसत नाही. मला विश्वास आहे की महाराष्ट्राच्या लेकी यांच्या अत्याचारासमोर उभ्या राहतील, कारण या जिजाऊच्या लेकी आहेत,” असं मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘महाराष्ट्र बंद’ला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्याचा दावा करत यशोमती ठाकूर यांनी जनतेचे मानले आभार
- ‘उद्धव ठाकरेंमध्येही अलीकडे राहुल गांधींची झलक दिसू लागली आहे’, भाजपचा टोला
- ‘महाराष्ट्र बंद’ दरम्यान राज्यभरातील एसटी सेवा सुरू राहणार, महामंडळाचा निर्णय
- ‘आशिष मिश्राला वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे’; नाना पटोले
- ‘नागरिकांनी घाबरून न जाता कुणी दबाव टाकत असेल तर भाजपाच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
