Share

‘नागरिकांनी घाबरून न जाता कुणी दबाव टाकत असेल तर भाजपाच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा’

Published On: 

🕒 1 min read

पुणे – उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारनं पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद आहे. मुंबईत काल मध्यरात्रीपासून आठ बसची तोडफोड झाली आहे. ठाण्यात बस बंद आहेत. नवी मुंबईत कृषी उत्पन्न बाजार समिती, तसंच दुकानंही बंद ठेवण्यात आली आहेत. अनेक ठिकाणी महाविकास आघाडीतील नेते हे रस्त्यावर उतरून बंद मध्ये सहभागी होण्यासाठी जनतेला आणि व्यापारी वर्गाला आवाहन करत आहेत.

महाविकास आघाडी सरकारनं पुकारलेल्या बंदच्या मुद्यावरून भाजप आणि महाविकास आघाडीतील नेते एकमेकांवर टीका टिपण्णी करताना पाहायला मिळत आहेत. भाजप नेते जगदीश मुळीक यांनी याच मुद्द्यावरून महाविकास आघाडीवर शरसंधान केले आहे . ते म्हणाले,MVA कडून पाळण्यात येणारा बंद राज्य सरकारच्या मंत्र्यांचे भ्रष्टाचार बाहेर येत आहेत त्या नैराश्यातून आहे. पोलिसांना आवाहन आहे की कुणी बंद करण्यासाठी जबरदस्ती करत असेल तर गुन्हे नोंदवावे. नागरिकांनी घाबरून न जाता कुणी दबाव टाकत असेल तर भाजपाच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा असे आवाहन मुळीक यांनी केले आहे.

दुसऱ्या बाजूला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनीही याच मुद्यावरून महाविकास आघाडीवर टीका केली आहे. ते म्हणाले, लखीमपुरच्या शेतकऱ्यांबद्दल आम्हाला संपूर्ण सहानूभूती आणि सहवेदना आहे. म्हणूनच याचा सर्व तपास सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरू आहे.आणि आमचे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगीजी ते क्षमतापूर्ण आहेत, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी ते नक्कीच कठोर निर्णयही घेतील. पण जनाब राऊत तुम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांबद्दल बोला. तो ओल्या दुष्काळामुळे आत्महत्येच्या उंबरठ्यावर आला आहे.

शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू म्हणणारे अजूनपर्यंत त्याला मदत द्यायला बांधावरती पोहचले नाही. अजूनही शेतकऱ्यांना पंचनाम्याच्या खाबूगिरीतच अडकवलेलं आहे. तुमचा हा महाराष्ट्र बंदचा कांगावा म्हणजे आपल्या घरात आग लागलेली असताना शेजारच्या गावातील धुरावर बोंबा मारण्यासारखे आहे. मुळात तुम्हाला काकाचं दु:ख सतावत आहे. कारण मा. पंतप्रधान मोदीजी महाराष्ट्राच्या सहकाराला लागलेली प्रस्थापितांची किड साफ करतायेत. आणि शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे खाणारे कारखाने कवडी मोल भावाने गिळणाऱ्यावरती फास आवळत आहेत.त्याचंच पित्त झाल्यामुळे हा महाराष्ट्र बंदचा देखावा आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!