मुंबई – उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारनं पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद आहे. मुंबईत काल मध्यरात्रीपासून आठ बसची तोडफोड झाली आहे. ठाण्यात बस बंद आहेत. नवी मुंबईत कृषी उत्पन्न बाजार समिती, तसंच दुकानंही बंद ठेवण्यात आली आहेत. महाविकास आघाडीतील नेते हे रस्त्यावर उतरून बंद मध्ये सहभागी होण्यासाठी जनतेला आणि व्यापारी वर्गाला आवाहन करत आहेत.
दरम्यान, अनेक ठिकाणी लोकांनी आणि व्यापाऱ्यांनी या बंदला विरोध केल्याचे देखील दिसून येत आहे. अनेक ठिकाणी दुकाने बंद असली तरीही व्यापार सुरूच असल्याचे देखील दिसून आले आहे. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी सरकारनं पुकारलेल्या बंदच्या मुद्यावरून भाजप आणि महाविकास आघाडीतील नेते एकमेकांवर टीका टिपण्णी करताना पाहायला मिळत आहेत. एकंदरीतच या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला असल्याचे दिसून येत आहेत.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र बंदला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्याचा दावा करत महिला व बालविकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर यांनी राज्यातील जनतेचे मनापासून आभार मानले. हुकूमशाही आणि हिटलरशाहीच्या विरोधात हा बंद आहे, शेतकऱ्यांनी घाबरू नये आम्ही तुमच्या सोबत आहोत असं ही यशोमती ठाकूर यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
दुसऱ्या बाजूला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी याच मुद्यावरून महाविकास आघाडीवर टीका केली आहे. ते म्हणाले, लखीमपुरच्या शेतकऱ्यांबद्दल आम्हाला संपूर्ण सहानूभूती आणि सहवेदना आहे. म्हणूनच याचा सर्व तपास सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरू आहे.आणि आमचे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगीजी ते क्षमतापूर्ण आहेत, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी ते नक्कीच कठोर निर्णयही घेतील असं पडळकर यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पावसाने केला भाजपच्या अपयशाचा पंचनामा; माजी आमदार मोहन जोशी यांची खरमरीत टीका
- ‘उद्धव ठाकरेंमध्येही अलीकडे राहुल गांधींची झलक दिसू लागली आहे’, भाजपचा टोला
- ‘महाराष्ट्र बंद’ दरम्यान राज्यभरातील एसटी सेवा सुरू राहणार, महामंडळाचा निर्णय
- ‘आशिष मिश्राला वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे’; नाना पटोले
- ‘नागरिकांनी घाबरून न जाता कुणी दबाव टाकत असेल तर भाजपाच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
