मुंबई : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडू उत्तम कामगिरी करत आहेत. त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अनेक पदक ते भारतासाठी जिंकून अंतरराष्ट्रीय स्थरावर भारताचे नावलौकिक करत आहे. महिला हॉकी संघ, पी.व्ही सिंधू यांनी उत्तम कामगिरी करून देशाचे नाव अंतरराष्ट्रीय स्थरावर गाजवले.
त्यांचे पंतप्रधन नरेंद्र मोदी यांनी भारतात होल्डिंग लाऊन अभिनंदन केले. त्यावर काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी टीका केली. ते म्हणले, प्रत्येक यशस्वी ऑलिम्पिक मेडल विजेत्याच्या मागे पंतप्रधानांचा मोठ्ठा फोटो असतो. ‘मोदी है तो मुमकीन है’ या शब्दात त्यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. तसेच त्यांनी सोशल मिडीयावर एक विनोद पोस्ट करून मोदींना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. ‘लांब फेकण्याचा सर्वोत्तम अनुभव असलेला देशाचा खेळाडू, टोकियोला पाठवला गेला नाही. भारताने सुवर्णपदकाची संधी गमावली’ असे म्हणत एक स्माईल पोस्ट केली आहे.
प्रत्येक यशस्वी ऑलिम्पिक मेडल विजेत्याच्या मागे पंतप्रधानांचा मोठ्ठा फोटो असतो..(फक्त भारतात)
मोदी है तो मुमकीन है ????
— Bhai Jagtap – भाई जगताप (@BhaiJagtap1) August 2, 2021
टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळाची रणधुमाळी सुरू असताना देशात मात्र राजकीय धुळवड सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर विरोधक टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. कोरोना, लसीकरण, ढासळलेली अर्थव्यवस्था, इंधन दरवाढ, महागाई इत्यादी मुद्द्यांवरून काँग्रेस नेते मोदी सरकारला टार्गेट करत आहेत
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी मोदींची परवानगी घ्यावी लागेल’, चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य
- ‘लांब फेकणारा खेळाडू टोकियोला गेला नाही, त्यामुळे भारताने गोल्डन संधी गमावली’, काँग्रेसचा टोला
- ‘शब्दांचे खेळ, भावनिक आवाहन, ड्रायव्हिंगशिवाय येतंय काय? मग शरद पवारांनी कौतूक केले कशाचे?’
- बीसीसीआयचा पीसीबीला असाही झटका, पाकविरुद्धची मालिका सोडून खेळाडू खेळणार आयपीएल
- खुशखबर! इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील खेळपट्टी फिरकीपटूसाठी पोषक


