नागपूर : शहरात व ग्रामीण भागात वाढत असलेली कोरोनाची रुग्ण संख्या ही चिंताजनक आहे. ज्या पद्धतीने धारावी व कोळीवाडासह मुंबईतील इतर भागातील कोरोनाचा प्रकोप रोखण्यासाठी ज्या तज्ज्ञांनी उपायोजना केल्या ते तज्ज्ञ आज शहरात येणार असून, दुपारी ते परिस्थितीचा आढावा घेणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
यात मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांचासह डॉ. हेमल शहा ( फुप्फुस विशेषज्ञ), डॉ. राहुल पंडित (गंभीर रोग विशेषज्ञ), डॉ. मुफझल लकडावाला (जनरल सर्जन), डॉ. गौरव चतुर्वेदी (कान, नाक, घसा विशेषज्ञ ) यांच्यासह इतर तज्ज्ञांचा समावेश आहे. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली.
राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराची कोरोनावर मात…
मुंबई येथील हॉटस्पॉट ठरलेल्या कोळीवाडा व धारावीसह मुंबईच्या इतर भागात मोठय़ा प्रमाणात कोरोनाचे रुग्ण निघत होते. परंतु आता येथील परिस्थिती अगदी सामान्य झाली आहे. त्याच पद्धतीने किंबहुना त्यापेक्षाही जास्त आता नागपूर शहरात व ग्रामीण भागात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. स्थानिक प्रशासन अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांचे काम करीत आहे.
श्रीरामपूरमध्ये जिल्हा परिषद सदस्य व बाजार समितीचे संचालक एकमेकांना भिडले!
ज्या पद्धतीने धारावी व कोळीवाडासह मुंबईतील इतर भागात कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांनी प्रयत्न केले त्याच धर्तीवर त्यांचा अनुभव घेऊन नागपुरात काय उपाययोजना कराव्या लागतील याची चर्चा या बैठकीत होणार आहे. डॉ. हेमल शहा, डॉ. राहुल पंडित, डॉ. मुफझल लकडावाला, डॉ. गौरव चतुर्वेदी यांनी ज्या पद्धतीने मुंबई येथे कोरोनाची परिस्थिती हाताळली त्याच पद्धतीने नागपूर येथील परिस्थिती कशी हाताळायची यावर ते मार्गदर्शन करणार असल्याची माहितीसुद्धा अनिल देशमुख यांनी दिली.
श्रीगोंदा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा शुभांगी पोटे आणि नगरसेवक पोटे यांच्यावर अपात्रतेची कारवाई होणार?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

