Share

राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराची कोरोनावर मात…

Published On: 

सोलापूर प्रतिनिधी: मोहोळ विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वादामुळे मी कोरोनाला हरवू शकलो. त्यामुळे या पुढील काळात मतदार संघातील अडीअडचणी सोडवण्यासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी लवकरच मतदार संघात येणार असल्याची माहिती मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंत माने यांनी दिली.

कोरोना संसर्गाच्या काळामध्ये आमदार यशवंत माने यांनी मतदार संघातील जनतेच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी नियमित भेटी देऊन समस्या जाणून घेण्याचा नित्यक्रम ठेवला होता. त्यादरम्यानच पुणे दौऱ्यावरून परत आल्यानंतर त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्या शिवाय त्यांची पत्नी, मुलगी व स्वीय सहाय्यक संतोष ननवरे यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान तब्बल बारा दिवस उपचार घेतल्यानंतर आमदार यशवंत माने यांच्यासह त्यांची पत्नी, मुलगी तसेच स्वीय सहाय्यक पत्रकार संतोष ननवरे यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. ३ सप्टेंबर रोजी त्यांना दवाखान्यातून घरी सोडण्यात आले.

श्रीरामपूरमध्ये जिल्हा परिषद सदस्य व बाजार समितीचे संचालक एकमेकांना भिडले!

या बाबत आमदार यशवंत माने यांनी भ्रमणध्वनीवरून महाराष्ट्र देशा ला प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी क्वारंटाईन होणार आहे. त्यानंतर मोहोळ मतदारसंघातील जनतेच्या सेवेत रुजू होणार आहे. एकंदरीत आमदार यशवंत माने यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने मोहोळ मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.

श्रीगोंदा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा शुभांगी पोटे आणि नगरसेवक पोटे यांच्यावर अपात्रतेची कारवाई होणार?

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!