Share

श्रीगोंदा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा शुभांगी पोटे आणि नगरसेवक पोटे यांच्यावर अपात्रतेची कारवाई होणार?

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा नगरपरिषदेच्या विद्यमान नगराध्यक्षा शुभांगी पोटे आणि त्यांचे पती नगरसेवक मनोहर पोटे यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. या दोघांवर वारंवार पक्ष बदल केल्याप्रकरणी पक्षांतर बंदी कायद्यानुसार अहमदनगरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे संभाजी ब्रिगेडचे टिळक भोस, सतीश बोरुडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ॲड.ऋषिकेश गायकवाड आणि अख्तर शेख यांनी तक्रार अर्ज दाखल केला होता. सदर अर्जावरील अंतिम सुनावणी सोमवार दि. ७ सप्टेंबर रोजी ठेवण्यात आलेली असल्याची माहिती अर्जदार आणि संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली.

श्रीगोंदा नगरपरिषदेच्या निवडणुकीत विद्यमान नगराध्यक्षा शुभांगी पोटे आणि त्यांचे पती नगरसेवक मनोहर पोटे या दोघांनी श्रीगोंदा नगरपालिकेची निवडणूक काँग्रेसच्या पंजा या चिन्हावर लढवून जिंकलेली होती. त्यानंतर ऑक्टोबर २०१९ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजप पक्षात प्रवेश करून श्रीगोंद्यामध्ये भाजपच्या बबनराव पाचपुते यांचा प्रचार त्यांनी केला. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाल्यानंतर त्यांनी पुन्हा काँग्रेस पक्षाचे काम सुरू केले.

निलेश राणे म्हणजे पिसाळलेला श्वान, शिवसेना नेत्याचा घणाघात

एकंदरीत पोटे पती, पत्नी हे काँग्रेस, भाजपा आणि पुन्हा काँग्रेस मध्ये सामील झालेले असल्याने त्यांच्या या वारंवार पक्ष बदलण्याच्या कृतीमुळे त्यांना महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम १९८६ च्या कलम (३) (१) (अ) प्रमाणे अपात्र ठरवावे, असा अर्ज संभाजी ब्रिगेडचे टिळक भोस व त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केलेला होता. ह्या प्रकरणाची अंतिम सुनावणी दिनांक ७ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. नगराध्यक्षा शुभांगी पोटे आणि नगरसेवक मनोहर पोटे यांच्यावर अपात्रतेची कारवाई होणार का? याकडे संपूर्ण श्रीगोंदा तालुक्याचे लक्ष लागले आहे.

रिया चक्रवर्तीच्या भावाला अटक, एनसीबीची मोठी कारवाई

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!