Share

गौतम गंभीर यांच्या ‘जन रसोई’त मिळणार १ रुपयात पोटभर जेवण

Published On: 

नवी दिल्ली  : भारतीय संघाचा माजी सलामीवीर आणि भाजपा खासदार गौतम गंभीर सह अनेकांनी कोरोना संकटात अनेकांची मदत केली. माजी सलामीवीर गौतम गंभीर यांनी त्यांच्या खासदार फंडातील निधी दिल्ली सरकारला कोरोना काळात मदत करण्यासाठी दिला. गौतम गंभीर फाऊंडेशनच्या माध्यमातून स्थलांतरीत मजूरांनाही भरभरून मदत केली.

तसेच त्यांनी तृतीय पंथीयांनाही लॉकडाऊनच्या काळात रेशन पुरवले. आता गंभीर यांनी जनतेच्या मदतीसाठी आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. पूर्व दिल्लीच्या मतदार संघात १ रुपयांत जेवणाची सोय करणारी ‘जन रसोई’ सुरू केली आहे. गुरुवारी त्यांनी गांधी नगर येथे जन रसोईच्या पहिल्या कँटिनचे उद्घाटन केले.

त्यानंतर अशोक नगर येथे दुसरी कँटिन सुरू केली जाणार असल्याचे, त्याच्या कार्यालयातून सांगण्यात आले. ”कोणत्याही जाती, धर्म आणि पंथाच्या व्यक्तिला निरोगी आणि आरोग्यदायी जेवण मिळायलाच हवं, तो प्रत्येकाचा हक्कच आहे, असे मला वाटते. बेघर आणि निराधार लोकांना दोन वेळचं जेवणही मिळत नसल्याचे पाहून वाईट वाटते,”असे गंभीर म्हणाला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!