Share

रासप आमदार रत्नाकर गुट्टेंना ईडीचा दणका, तब्बल 255 कोटींची मालमत्ता जप्त

Published On: 

🕒 1 min read

बीड: रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झालीय. त्यांना शेतकरी आणि इतर उद्योगांच्या नावावर कर्ज घेणं भोवलं असून, अंबाजोगाई रोडवरील योगेश्वरी हॅचरिज ही मालमत्ता रात्री उशिरा ईडीने कारवाईत जप्त केलीय. गुट्टे यांनी शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज घेतले होते.

रत्नाकर गुट्टे यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली असून गुट्टे यांची २५५ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. बुधवारी रात्री उशिरा ईडीने कारवाई करत रत्नाकर गुट्टे यांच्या गंगाखेड शुगर आणि एनर्जी लिमिटेड या कंपनीची परभणी बीड आणि धुळे येथील तब्बल २५५ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.

ईडीने काल रात्री उशिरा कारवाई करत गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेड २४७ कोटी किमतींची यंत्र तसेच पाच कोटी रुपयांची जमीन, योगेश्वरी हॅचरीज, गंगाखेड सोलार पॉवर लिमिटेडच्या परभणी, बीड आणि धुळे येथील बँकांमधील सुमारे दीड कोटी रुपये किंमतीच्या गुंतवणुकी आणि गंगाखेड शुगर्स लिमिटेड यांची एक कोटी दहा लाख रुपये किंमतीचे समभाग इत्यादी मालमत्ता अशी एकूण २५५ कोटीची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या नावाने परस्पर कोट्यवधींचे कर्ज घेतल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांना 5 मार्च 2020 मध्ये जामीन मिळाला. जवळपास वर्षभरानंतर ते बाहेर आले. दरम्यान, गुट्टे यांनी कारागृहातूनच 2019 मध्ये गंगाखेड विधानसभेची निवडणूक लढवली आणि ते जिंकले होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!