कोल्हापूर : बेळगावात एक संतापजनक कृत्य समोर आलं आहे. बेळगावातील एका गावातून चक्क छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आला आहे. मनगुत्ती गावातील शिवरायांचा पुतळा हटवण्यात आला आहे. ७ ऑगस्टच्या रात्री हा पुतळा काढण्यात आला आहे. यावरून आता राज्यभरातून शिवभक्तांची संतप्त प्रतिक्रिया येत आहे. तर, शिवसेना देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
कर्नाटक सरकारने हद्द पार केली असून, महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवरायांचा पुतळा एका रात्रीत काढला गेला. हा पुतळा पुन्हा सन्मानाने आहे, त्या जागी विराजमान करा, अन्यथा कर्नाटकात येवून मस्ती जिरवू, असा सज्जड इशारा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी कर्नाटक सरकारला दिला आहे. सीमाभागातील बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात बसविण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बेळगाव जिल्हा प्रशासनाने रातोरात हटविला. या घटनेचा निषेध करीत कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसेनेने कर्नाटकी सरकारच्या प्रतिमेचे दहन केले.
छत्रपती शिवरायांच्या नावाने केंद्रात सत्तेत यायचं आणि कर्नाटकात… मंत्री उदय सामंतांचा घणाघात
“कर्नाटक शासनाची दडपशाही खपवून घेतली जाणार नाही” अशा निषेधाच्या घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर दणाणून सोडला. कर्नाटक सरकारमध्ये मराठी द्वेष एवढा आहे की मराठी बांधवांना मारहाण करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे आहे. त्यास तेथील कानडी गुंडाची साथही आहे. गेल्या काही वर्षापूर्वी कानडी गुंडांनी शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान करण्याचा प्रयत्न केला पण त्या कानडी गुंडांना कोल्हापूरच्या शिवसैनिकांनी योग्य धडा शिकविला आहे. परंतु, आज छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करत असतील तर त्यांनी याद राखावं कोल्हापुरात एकाही कानडी माणसाला राहू देणार नाही, याची नोंद कर्नाटक सरकारने घ्यावी, असा इशारा क्षीरसागर यांनी दिला.
आशिष शेलरांनी केलं ठाकरे पुत्राचं कौतुक
भाजपच जिथे सरकार आहे, तिथे छत्रपती शिवरायांचा अवमान करण्याचे कृत्य होत आहेत. ही गोष्ट वेळीच भाजप सरकारने रोखावी अन्यथा कोल्हापुरातील शिवसैनिक शांत बसणार नाही, त्यांची शिवसेनेशी गाठ असेल, याची दखल घ्यावी. घडलेली घटना शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना कळविली असून, पक्षप्रमुखांचा आदेश आल्यास कर्नाटकात घुसून कर्नाटक सरकारचा माज उतरवू, असा इशारा माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी कर्नाटक सरकारला दिला आहे.
थोरात,चव्हाण व ठाकूर यांच्याकडून निलंगेकर कुटुंबियांचे सांत्वन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

