मुंबई: २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपा आणि शिवसेनेचा महायुतीसोबत चालू असलेला संसार अचानक मोडला होता. काही मतभेदांवरून शिवसेनेने महायुतीची साथ सोडून राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत मिळून महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन केले. त्यामुळे, राज्यात सर्वाधिक १०५ जागा निवडून आलेल्या भाजपाला विरोधी बाकावर बसावे लागले.
यानंतर, सरकारच्या कारभारावर टीका करण्याची कोणतीही संधी भाजपाने सोडलेली नसून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या या सरकारला वेळोवेळी घेरण्याचे प्रयत्न भाजपाने केले आहे. या तीन चाकी असलेल्या सरकारचे काही खरे नसून अंतर्गत वादांनी कधीही कोसळू शकते असे भाकीत भाजपाने वर्तवले आहे. तर, हे सरकार राज्याच्या विकासासाठी खंबीर असून आता भाजपाने सत्तेचे स्वप्न विसरावे असे महाविकास आघाडीकडून सांगितले जात आहे. त्यामुळे, शिवसेना आणि भाजपा यांच्यामध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप चांगलेच रंगताना दिसत आहे.
छत्रपती शिवरायांच्या नावाने केंद्रात सत्तेत यायचं आणि कर्नाटकात… मंत्री उदय सामंतांचा घणाघात
यातच, सरकारला जाब विचारण्यात अग्रस्थानी असलेले भाजपाचे आमदार ऍड. आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सुपुत्राचे कौतुक केले आहे, त्यामुळे अनेकांच्या भुवया पुन्हा उंचावल्या आहेत. ठाकरेंचे धाकटे चिरंजीव तेजस याच्या संशोधन प्रेमावरून शेलरांनी कौतुक केले आहे. ” तेजस ठाकरे यांनी खेकडे,पाली नंतर गोगलगाईच्या संशोधनासाठी परवानगी मागितली त्याला वन्य जीव मंडळाने मंजूरी दिली. ही अत्यंत चांगली बाब आहे. निसर्ग प्राणीमात्रेची निर्मिती विशिष्ट हेतूने करतो आपण त्याबद्दल अनभिज्ञ असतो. त्यामुळे संशोधन आवश्यकच! महाराष्ट्राचा हा पुढाकार आनंददायीच!,” असे ट्विट करत त्यांनी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.
तेजस ठाकरे यांनी खेकडे,पाली नंतर गोगलगाईच्या संशोधनासाठी परवानगी मागितली त्याला वन्य जीव मंडळाने मंजूरी दिली. ही अत्यंत चांगली बाब आहे. निसर्ग प्राणीमात्रेची निर्मिती विशिष्ट हेतूने करतो आपण त्याबद्दल अनभिज्ञ असतो. त्यामुळे संशोधन आवश्यकच!
महाराष्ट्राचा हा पुढाकार आनंददायीच!— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 9, 2020
शिक्षकांच्या अडचणी सोडवून त्यांच्या सोयीनुसार आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देऊ – भुसे
तेजस ठाकरे, अनिकेत मराठे, स्वप्निल पवार आणि अमृत भोसले यांना उत्तर पश्चिम घाट संरक्षित वनामध्ये जमिनीवरील गोगलगाईचं संशोधन करण्याची परवानगी मिळाली आहे. जैवविविधता, खनिज संपत्ती यांनी समृद्ध असलेला व अनेक प्रजातींचा अधिवास असलेला पश्चिम घाट हा आकर्षण केंद्र आहे. राज्य सरकारच्या वन्यजीव मंडळाची 15 वी बैठक शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
मानवतावादी दृष्टीकोनातून कुठल्याही रुग्णावर उपचार झाला पाहिजे- दादाजी भुसे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

