बेळगाव: बेळगावात एक संतापजनक कृत्य समोर आलं आहे. बेळगावातील एका गावातून चक्क छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आला आहे. मनगुत्ती गावातील शिवरायांचा पुतळा हटवण्यात आला आहे. ७ ऑगस्टच्या रात्री हा पुतळा काढण्यात आला आहे. यावरून आता राज्यभरातून शिवभक्तांची संतप्त प्रतिक्रिया येत आहे.
तर, सीमाभागातील शिवप्रेमी बांधव हे या ठिकाणी जाऊन कर्नाटक सरकारच्या विरोधात निषेध करत आंदोलन करणार असल्याच्या तयारीत असल्याचे समजत आहे. या प्रकरणी आता, कर्नाटकात सत्ता असणाऱ्या भाजपाच्या खोट्या शिवभक्तीवर राजकीय पक्षांनी निशाणा साधल्याचे दिसून येत आहे. या घटनेवरून शिवसेना आक्रमक झाली असून राज्यभरात आता रस्त्यावर उतरून शिवसैनिक आंदोलन करणार आहेत.
भाजपच्या मनात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबाबत द्वेष का आहे ?
दरम्यान, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी देखील ट्विट करत भाजपावर टीका केली आहे. ” छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने केंद्रात सत्तेत यायचं.. पण त्याच पक्षाच्या कर्नाटक सरकारने मराठी माणसाने स्थापना केलेला शिव छत्रपतींचा पुतळा काढून टाकायचा.. आत्ता जनतेचं ठरवावं काय योग्य आणि काय अयोग्य.. जय शिवराय.. !,” असा घणाघात उदय सामंत यांनी भाजपावर केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने केंद्रात सत्तेत यायचं.. पण त्याच पक्षाच्या कर्नाटक सरकारने मराठी माणसाने स्थापना केलेला शिव छत्रपतींचा पुतळा काढून टाकायचा.. आत्ता जनतेचं ठरवावं काय योग्य आणि काय अयोग्य.. जय शिवराय.. ! pic.twitter.com/cSVe8tyzbM
— Uday Samant (@samant_uday) August 9, 2020
बारामती शहरासह तालुक्यात ‘कोरोना’ प्रतिबंधक उपाययोजना कडक राबवा-अजित पवार
तसेच, भाजपचे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे प्रेम फक्त मतांपुरते आहे हे कर्नाटक राज्यात छत्रपतींचा पुतळा रातोरात हटवून सिध्द झाले असून या घटनेचा तीव्र निषेध राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण ?
मणगुत्ती गावातील चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता, गेल्या २ वर्षापासून हा पुतळा बसवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी सहा महिन्यांपूर्वी चबुतरादेखील तयार केला. या चबुतऱ्यावर गुरुवारी ग्रामस्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला.
मानवतावादी दृष्टीकोनातून कुठल्याही रुग्णावर उपचार झाला पाहिजे- दादाजी भुसे
मात्र गावातील काही समाजाच्या लोकांनी याला विरोध केला. त्यांनी छत्रपतींचा पुतळा काढण्याचा प्रयत्न केला.तणाव वाढल्याने गावात स्थानिक प्रशासन आणि पोलीस दाखल झाले. गावात ८० टक्क्याहून जास्त मराठी बांधव असल्याने त्यांनी मूर्ती हटवण्यास विरोध केला. पुतळा बसवण्यासाठी पोलीस आणि तहसिलदारांची परवानगी नसल्याचं प्रशासनाने सांगितले. यानंतर ही मूर्ती प्लास्टिकने झाकण्यात आली.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

