Share

‘…अन्यथा ठाकरेंच्या हस्ते शासकीय महापूजा होऊ देणार नाही’ ; धनगर आरक्षण कृती समितीचा इशारा

Published On: 

🕒 1 min read

पंढरपूर : सध्या महाराष्ट्रातील राजकारण विविध समजाच्या आरक्षण प्रश्नांच्या मुद्द्यांवर चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने राज्य सरकारच्या विरोधात राज्यभरात आंदोलनाची हाक दिलेली असतानाच आता धनगर समाजही आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला आहे. विधीमंडळाचे विशेष अधिवेशन घेवून त्यामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा मांडून तो बहुमतांनी सहमत करावा, अशी मागणी धनगर समाजाने केली आहे.

दरम्यान आता ‘धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला नाही तर आषाढी एकादशीच्या दिवशी पंढपूरमधील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणारी शासकीय महापूजा होऊ देणार नाही,’ असा इशारा धनगर आरक्षण कृती समितीने दिला आहे. सध्या मराठा समाज आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आहे. विविध मराठा समाज संघटनांनी राज्य सरकार विरोधात आंदोलनाची हाक दिली आहे.

मराठा आंदोलनामुळे राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यत असतानाच धनगर समाजानेही आरक्षण मागणीसाठी थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनाच इशारा दिला आहे. आरक्षण मागणीवरुन राज्यभरात आंदोलन पेटण्याची शक्यताही या निमित्ताने व्यक्त केली जात आहे. पंढरपूर येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर वाड्यामध्ये धनगर आरक्षण कृती समितीची आज बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर आदित्य फत्तेपूरकर यांनी बैठकीतील चर्चेचा तपशील दिला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!