Share

‘…अन्यथा देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडेल’ ; नवाब मलिकांचे भाकीत

Published On: 

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी भाजप पक्ष अनेकविध मुद्द्यांवरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेवरून टीका केली आहे.

रिझर्व्ह बॅंकचे गव्हर्नर किंवा त्यांची संपूर्ण व्यवस्था देशाची अर्थव्यवस्था मोजण्यात अपयशी होत असेल, तर देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडेल, असे मलिक यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने निव्वळ हेडलाईन मॅनेजमेंट करण्याऐवजी देशाचा एक चार्ट बनवून देशातील जनतेसमोर ठेवावा, अशी मागणी देखील यावेळी त्यांनी केली आहे.

रिझर्व्ह बॅंकचे गव्हर्नर किंवा त्यांची संपुर्ण व्यवस्था देशाची अर्थव्यवस्था मोजण्यात अपयशी होत असेल तर देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडेल अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केली आहे.

देशाचा जीडीपी उणे 7.5 टक्क्यांपर्यंत खाली घसरला ही सत्य परिस्थिती आहे. याचा अर्थ रिझर्व्ह बँकेकडून आकलन चुकीचे होत आहे. सरकार पैसे मागतेय तर तुम्ही देताय. रिझर्व्ह बॅंकेला हे कळलं पाहिजे. तुम्ही अंदाज घेत नाही मग देशाची अर्थव्यवस्था कशी चालणार आहे असा सवालही नवाब मलिक यांनी यावेळी केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!