Share

अन्यथा महावितरणला टाळे ठोकणार : आमदार संतोष दानवे

Published On: 

जालना : कोरोना काळात थकीत वीज बील न भरल्यामुळे वीज पुरवठा खंडीत करण्याचा निर्णय महावितरणने घेतला. यावेळी कोणतीही पुर्वसूचना देता वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. तसेच राज्यातील ७२ लाख वीज जोडण्यांचा पुरवठा खंडित करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. हा जुलमी निर्णय त्वरीत मागे घ्यावा, अन्यथा ५ फेब्रुवारी रोजी भाजपचे कार्यकर्ते जिल्हाभर महावितरण कार्यालयांना टाळे ठोकतील, असा इशारा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार संतोष पाटील दानवे यांनी दिला

कोरोना काळात थकीत वीज बील माफ होईल असे अश्वासन राज्य सरकारने राज्यातील जनतेला दिले होते. पण कोरोना संसर्ग आता ओसरत असताना सरकारने सक्तिने वीज बील वसूली सुरु केली आहे. याच्या विरोधात भाजपचे कार्यकर्ते ५ फेब्रुवारी रोजी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असे आमदार संतोष पाटील दानवे यांनी म्हटले आहे.

फडणवीस सरकारच्या काळात आम्ही कधीच शेतकऱ्यांना वीज बिल भरण्याची सक्ती केली नाही. यामुळे थकबाकी वाढली तरी तो भार राज्य सरकारने स्वत:वर घेतला. आमचे राज्य असताना कृषी क्षेत्रासाठी साडेसात लाख नवीन वीज जोडण्या दिल्या. पण वीज कंपन्यांही फायद्यात राहील्या होत्या. कोरोना काळात अवाजवी वीज बिल आल्यावर ती बिलं भरण्याची क्षमता सामान्य माणसाकडे नाही. विविध कारणांनी संकटात आलेला शेतकरीही वीज बिल भरण्याच्या अवस्थेत नाही.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!