Share

अजिंक्य रहाणेचंही इंडिया टुगेदर या हॅशटॅग; पण रिप्लाय केलाय ‘ब्लॉक’ !

Published On: 

नवी दिल्ली: कृषी कायद्यांविरोधात मागच्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. 11 बैठका होऊन सुद्धा आंदोलनावर तोडगा निघालेला नाही. सरकार चर्चेची दारं खुली असल्याचं सांगत आहे मात्र कायदे मागे घेण्याबाबत अजिबात तयार नसल्याचे चित्र आहे. दुसऱ्या बाजूला या कायद्यांना विरोध करणारे शेतकरी मात्र कायदे रद्द करण्याच्या मागणीवर अडून बसल्याचे दिसून येत आहे.

सुरुवातीपासूनच या आंदोलनाच्या समर्थनार्थ काही सेलिब्रिटी पुढे आले होते. आता या देशी सेलिब्रिटीज बरोबर काही परदेशी सेलिब्रिटी सुद्धा समर्थनार्थ पुढे आले आहेत.पॉप सिंगर रिहानाने समर्थनार्थ ट्वीट केल्यानंतर पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग, पूर्वाश्रमीची पॉर्न स्टार मिया खलिफानेही या आंदोलनाला पाठिंबा दिला.दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध गायिका व सेलेब्रिटी रिहाना, पर्यावरण चळवळीतली आघाडीची कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने ट्विट केल्याने मोदी सरकार हादरले.

यावरून आंतरराष्ट्रीय सेलिब्रेटींनी पाठींबा दिल्यानंतर आता वेगळेच वळण घेतले आहे. बाहेरच्या व्यक्तींनी भारताच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये नाक खूपसू नये असा पलटवार देशातील अनेक सेलिब्रेटींनी केली. त्यात महान फलंदाज सचिन तेंडुलकर खासदार गौतम गंभीर, विराट कोहली, रोहित शर्मा, सुरेश रैनासह अजिंक्य रहाणेचाही समावेश आहे. सर्वांनीच इंडिया टुगेदर या हॅशटॅगने ट्विट केलंय. मात्र, अजिंक्य रहाणेनं ट्विटचा रिप्लाय ब्लॉक केला आहे.

या खेळाडूंच्या आणि सेलिब्रिटींच्या ट्विटला रिप्लाय देत, त्यांच्यावर ट्विटर युजर्संकडून टीका करण्यात येत आहे. खेळाडूंना ट्रोल करण्यात येत आहे, सचिनलाही ट्रोल करण्यात आलंय. कदाचित याची पूर्वकल्पना असल्याने अजिंक्य रहाणेनं आपला रिप्लाय ब्लॉक करुन ठेवलाय.

आम्ही एकत्र असल्यास न सुटणारे असे कोणतेच प्रश्न नाहीत. त्यामुळे, चला आपण एक होऊ आणि आपल्या देशांतर्गत समस्येचं निराकरण करण्याच्या दिशेन कार्य करू, असे ट्विट अजिंक्य रहाणेनं केलंय. यासोबतच, India Together हा हॅशटॅगही त्याने दिलाय. मात्र, आपल्या ट्विटरचा रिप्लाय अजिंक्यने ब्लॉक केलाय. कदाचित, ट्विटरवर कमेंटमध्ये येणाऱ्या उत्तराची त्याला जाणीव होती, म्हणूनच त्याने रिप्लाय ब्लॉक केला आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!