नाशिक : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या स्थगितीनंतर वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळालं. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिल्यानंतर राज्यभरात मराठा समाजाने आक्रमक होऊन आंदोलने केली. यानंतर, स्थगिती उठवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने याचिका दाखल केल्या.
मराठा आरक्षण उठवण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. मराठा संघटनांसह भाजपने देखील राज्य सरकारवर टीका केल्याचं समोर आलं होतं. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार गंभीर नसल्याचा आरोप देखील काही नेत्यांनी केला. अशातच, विविध अभ्यासक्रमांच्या रखडलेल्या प्रवेश प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश राज्य सरकारने दिल्याने मराठा विद्यार्थ्यांना प्रवेशास अडथळा येऊ शकतो यावरून मराठा समाज आक्रमक झाला आहे.
मराठा विद्यार्थ्यांचे प्रश्न 2 डिसेंबरपर्यंत मार्गी लावा अन्यथा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरावर मोर्चा काढला जाईल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे. मराठा क्रांती मोर्चाची आज महत्त्वाची बैठक नाशिकमध्ये पार पडली. या बैठकीत मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारला 2 डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला. तसेच सर्व पक्षीय आमदारांना चोळीबांगड्या भेट देण्यात येईल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- नरेंद्र मोदींचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत : हुसेन दलवाई
- ‘पवार कुटुंबाचा लोमत्या …जयंत पाटलांचं काय काय गांजलेल आहे बोलायला लावू नका’
- भारत भालके यांच्या निधनाने जनतेच्या हाकेला धावून जाणारा लोकनेता हरपला – रामदास आठवले
- धक्कादायक : सद्यस्थितीत भारतातील 70% कोरोनाचे सक्रीय रुग्ण ‘या’ राज्यांमधून
- कोरोना साथीनंतरही ऑनलाईन शिक्षण सुरूच राहणार : एम. वेंकैया नायडू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

