🕒 1 min read
मुंबई : १०५ आमदार निवडून येऊन सुद्धा विरोधी पक्षपदावर समाधान मानाव्या लागणाऱ्या भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपमधील नेत्याची तथाकथित नाराजी वेळोवेळी समोर आली आहे. तर आता या नाराजीचा उद्रेक होऊन पक्ष बदलाच्या हालचालींना वेग आल्याचे आज सकाळपासून होणाऱ्या राजकीय बैठकांवरून वर्तवले जात आहे.
भाजपचे दिग्गज नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. त्याचबरोबर भाजपचे अन्य काही नेते देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशा चर्चाना उधाण आलं आहे. यासंबंधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातील राष्ट्रवादी आमदारांची बैठक सुरू आहे. इतर पक्षातील विशेषतः भाजपातील नेत्यांना यांना राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश द्यायचा का याबाबत खलबत सुरू असल्याची चर्चा आहे.
मात्र एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ खडसे यांच्याविषयीची कोणतीही चर्चा आजच्या बैठकीत झाली नाही. राष्ट्रवादीच्या बैठकीत जळगाव जलसिंचन प्रकल्पाबाबत चर्चा झाली. अस जयंत पाटील म्हणाले आहेत.
तर, एकनाथ खडसे यांच्या नाराजीबाबत ते ज्या पक्षात आहेत त्या पक्षाने विचार करावा, असा सल्ला जयंत पाटील यांनी भाजपला दिला. तसंच भविष्यात खडसे राष्ट्रवादीत येतील का, या प्रश्नावर जयंत पाटील यांनी, राजकारणात जर-तरला फार महत्व नसते, असं म्हणत उत्तर देणं टाळलं.
महत्वाच्या बातम्या
- ‘कोरोनावरील उपचारासाठीच्या रेमडेसिवीरचा दुर्गम भागातही पुरवठा करा’
- फडणवीसची एम्स आणि मेयो रुग्णालयाला भेट
- कोरोना बाधित रुग्णांना मिळेना रेमडीसीवीर इंजेक्शन, आ.जगताप यांचे आरोग्यमंत्री टोपे यांना साकडे
- राष्ट्रवादी काँग्रेस देणार भाजपला मोठा धक्का? ‘या’ बड्या नेत्याच्या पक्षप्रवेशाच्या चर्चा!
- अहमदनगर जिल्ह्यात काल दिवसभरात १८ मृत्यूसह ९०० कोरोना बाधित रुग्णांची वाढ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
