नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने थैमान घातला आहे. बुधवारी देशात रेकॉर्ड ब्रेक नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. अनेक राज्यांमध्ये आरोग्य व्यवस्था अपुऱ्या पडत असून रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटीलेटर्स, औषधे यांचा गंभीर तुटवडा जाणवत आहे. दरम्यन, सर्वोच्च न्यायालयाने यावरून केंद्र सरकारला फटकारले आहे.
दुसरीकडे, कोरोना संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी महत्वाचा पर्याय म्हणून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला महत्व दिले जात आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील लसीकरणासाठी वारंवार जनतेला आवाहन केलं असून आता अठरा वर्षांपुढील युवक वर्गाला देखील लसीकरण करून घेता येणार आहे.
दरम्यान, देशात सीरम इन्स्टिट्यूटने ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या सहयोगाने निर्मित केलेल्या ‘कोव्हीशील्ड’ ला पहिली मान्यता देण्यात आली. आता सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (SII)कोविशील्ड लशीची नवीन किंमत निश्चित केली असून एका भाजप आमदाराने सीरम व सीरमचे सीईओ अदर पुनावाला यांच्याबाबत धक्कादायक विधान केलं आहे.
@adarpoonawalla / तुम तो डकैतों से भी बदतर हो। @PMOIndia @AmitShah @blsanthosh @drharshvardhan को तुम्हारी फैक्टरी का एपिडेमिक ऐक्ट में अधिग्रहण कर लेना चाहिए।@RubikaLiyaquat@pankajjha @aroonpurie @sandeep_news24 @brajeshlive @chitraaum @anjanaomkashyap @PrannoyRoyNDTV
— Dr.Radha Mohan Das Agrawal (@AgrawalRMD) April 21, 2021
उत्तर प्रदेशमधील गोरखपूरचे भाजप आमदार डॉ. राधामोहनदार अग्रवाल यांनी अक्कल पाजळत अदर पुनावाला यांचा उल्लेख डाकू असा केला आहे. ‘अदर पुनावाला तुम्ही डाकू आहात. पंतप्रधान मोदी, अमित शाह, बी.एल. संतोष, डॉ. हर्षवर्धन यांनी तुमची कंपनी साथ रोग नियंत्रण (एपिडेमिक ऍक्ट)कायद्या अंतर्गत ताब्यात घेतली पाहिजे’ असं ट्वीट त्यांनी केलंय. यासोबतच, लसीची किंमत कमी झाली पाहिजे अशी मागणी देखील डॉ. राधामोहनदार अग्रवाल यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- अभिमानास्पद ! कोरोनाग्रस्त रुग्णांच्या सेवेसाठी पिंपरी-चिंचवडमधील रिक्षाचालकांचा पुढाकार
- भाजप नेत्याचे नीच राजकारण ! सीताराम येचुरी यांच्या मुलाच्या निधनावर आक्षेपार्ह टिपण्णी
- रॉयल शेतकरी ! ३५ वर्षांनी घराण्यात मुलीचा जन्म, आजोबांनी ‘लक्ष्मी’ला हेलिकॉप्टरने आणलं घरी
- ‘जावडेकरजी, कुठे आहेत १,१२१ व्हेंटिलेटर्स ? पुण्याला विशेष कोट्यातून लस कधी मिळणार?’
- मोदींच्या मतदारसंघात ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा, नवीन रुग्ण दाखल करून न घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

