मुंबई : मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटीन स्फोटकांच्या कांड्या असलेली स्कॉर्पिओ गाडी सापडली होती. यामुळे एकच खळबळ उडाली होती. यानंतर, स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृतदेह आढळून आला होता. यामुळे या प्रकरणाचे गूढ अधिकच वाढले होते. दरम्यान, या प्रकरणी सचिन वाझे याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला होता. सबळ पुराव्यांनिशी त्यांना एनआयएने अटक केली होती.
दरम्यान, आता आरोपीच्या पिंजऱ्यात असलेले माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे याला अखेर पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे. स्फोटके प्रकरणात अटक झाल्यानंतर जवळपास दोन महिन्यानंतर सचिन वाझे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी याप्रकरणी आदेश काढले आहेत. याशिवाय लवकरच पोलीस अधिकारी रियाझ काझी आणि सुनील माने यांनाही सेवेतून बडतर्फ करण्यात येणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे.
सचिन वाझे यांचे सहकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक रियाझुद्दीन काझी यांनाकाही दिवसांपूर्वी निलंबित करण्यात आले होते. राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयए नं काझी यांना अटक केल्यानंतर, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. वाझे यांना अटक केल्यानंतर आतापर्यंत तीन पोलिस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली असून, त्यांना यापूर्वी सेवेतून निलंबित करण्यात आलं होते. व त्यानंतर सचिन वाझेला आज बडतर्फ करून एक मोठा धक्का दिलेला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- हे ठाकरे सरकार की ‘माग रे सरकार?’; भाजप नेत्याची बोचरी टीका
- विनामास्क विनाकारण फिरणाऱ्यांकडून ग्रामीण पोलिसांनी केला ‘एवढा’ दंड वसूल
- व्यवहारे बंधुंचे कौतुकास्पद कार्य! वैयक्तिक कारचे केले रुग्णवाहिकेत रूपांतर
- औरंगाबादसह राज्यात एफसीआयचे दोन विभागीय कार्यालये, केंद्रीय मंत्री दानवे यांची घोषणा
- ‘भारत बायोटेक’च्या प्लॅन्टसाठी पुण्यात तातडीने जागा देणार – अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

