Share

हे ठाकरे सरकार की ‘माग रे सरकार?’; भाजप नेत्याची बोचरी टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मराठा आरक्षणाच्या संदर्भात केंद्र सरकारने पुढाकार घेऊन आरक्षण द्यावे अशी मागणी राज्य सरकारतर्फे करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला अधिकार नसून केंद्र सरकार याबाबत निर्णय घेऊ शकतं असं म्हटलं होतं. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष व मंत्री अशोक चव्हाण, मंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री जयंत पाटील आदी मंत्र्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन पत्र दिले आहे.

या भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘मराठा समाजाने संयम पाळला आहे, त्याबद्दल मी त्यांचे कौतुक करतो. सर्वोच्च न्यायालयाने म्हणल्याप्रमाणे हा प्रश्न केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे केंद्राने यात लवकरात लवकर हस्तक्षेप करावा यासाठी आम्ही राज्यपालांच्या मार्फत मागणी केली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील पत्र लिहिले असून प्रत्यक्षात भेट घेऊन देखील याबाबत मागणी करणार आहोत,’ असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

ठाकरे सरकारच्या या मागणीनंतर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी टीकास्त्र सोडलं आहे. ‘आलं अंगावर, ढकललं केंद्रावर… जे यांना झेपत नाही ते केंद्राने करून दिले की ‘मुख्यमंत्र्यांचा विजय’… असा निलाजरा PR करायचा. हेच आहे ठाकरे सरकारचे (की माग रे सरकार?) महाराष्ट्र मॉडेल,’ असा टोला भातखळकर यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!