Share

उस्मानाबादच्या खासदार-आमदारांची आवाड शिरपुरा येथे भेट; नुकसानीची केली पाहणी

Published On: 

🕒 1 min read

उस्मानाबाद : खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास घाडगे-पाटील यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या कळंब तालुक्यातील आवाड शिरपुरा येथील नुकसानीची पाहणी केली. यावेळी खासदार निंबाळकर यांनी गावातील शेतकरी बांधवाना आपल्या शेतातील पिकांचे झालेल्या नुकसानीच्या ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने तक्रार देऊन विमा कंपनीचे अधिकारी पंचनामा करते वेळेस आले असताना पंचनाम्याच्या फॉर्मवर संपूर्ण माहिती भरलेली असल्याशिवाय आपल्या सह्या न करण्याविषयी सूचित केले.

अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्यामुळे खरडून गेलेल्या असतील तर त्यांनीही पंचनामे करावेत अशाही सूचना केल्या आहेत. जेणेकरून अल्पभूधारक शेतकऱ्यांना खरडून गेलेल्या जमिनीचा वेगळा मोबदला मिळेल. तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांनी ऑनलाईन, ऑफलाइन तक्रारी स्विकाराव्यात, शेतकऱ्यांना ऑनलाइन, ऑफलाइन तक्रारी दाखल करण्यात अडचणी येत असतील तर प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तक्रारी दाखल करून घ्या, असा सूचनाही त्यांनी केल्या.

नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे लवकरात लवकर करावे, पंचनामे करताना चुका होणार नाहीत याची दक्षता घ्यावी, शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त क्षेत्राचे फोटो मागू नका, नादुरुस्त पर्जन्यमापक दुरुस्त करण्याबाबतच्या सूचना आमदार कैलास पाटील यांनी संबंधित विभागांच्या अधिकारी वर्गाला दिल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!