गंगाखेड तालुक्यात नदीतून अवैध उत्खनन करीत वाळूची चोरट्या मार्गाने सर्रास वाहतूक सुरु आहे. मूळी व दुसलगाव शिवारात पोकलेन, जेसीबी मशिनच्या सहाय्याने वाळूचे अवैधरित्या उत्खनन होत असल्याची माहिती गंगाखेड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांना मिळाली होती. त्यावरून त्यांनी मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास पोलीस अधिकारी – कर्मचाऱ्यांसह छापा टाकला. त्यावेळी तेथे एक पोकलेन मशीन, दोन जेसीबी मशिनच्या सहाय्याने वाळूचे उत्खनन होत असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी याप्रकरणी कारवाई करीत त्यातील साठा केलेली वाळू जप्त देखील केली आहे.
जप्त केलेल्या वाळूचे मोजमाप केले. या वेळी दोनशे ब्रास वाळू तेथे साठवून ठेवली असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी शुक्रवारी पोलीस कर्मचारी रतन सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तालुक्यातील मुळी शिवार व दुसलगाव शिवार या ठिकाणी छापा टाकून पोकलेन मशीन, दोन जेसीबी, दोनशे ब्रास वाळू जप्त केल्याचे नमूद केले ळ. अंदाजे १ कोटी ५६ लाख रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत जप्त केला असल्याचे रतन सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहेत.
- मावळ नंतर आता पंढरपूरमध्ये रंगणार शेळके विरुद्ध भेगडे सामना
- वैद्यकीय उपकरणे देण्यात देखील केंद्राने दुजाभाव केला, पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप
- ठाकरे सरकारच्या काळातच महाराष्ट्राची अधिक बदनामी झाली – रामदास आठवले
- स्वच्छ सर्वेक्षणाच्या पाहणीसाठी आलेल्या पथकाने मनपा अधिकाऱ्यांना दिला ‘चकवा’!
- कोरोनाची साखळी तोडली तरच अनेकांचे जीव वाचणार आहेत – अजित पवार


