मुंबई : महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विदर्भ आणि मराठवाड्यातील वैधानिक विकास महामंडळाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलीच जुंपली. राज्यपालांनी 12 सदस्यांची नियुक्ती जाहीर करताच वैधानिक विकास महामंडळाची स्थापना करू, असं अजित पवार यांनी सांगितलं.
त्याला फडणवीस यांनी कडाडून विरोध करत दादांच्या पोटातले ओठात आले. हा विदर्भ-मराठावाड्यातील जनतेला ओलीस ठेवण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कामकाज सुरू होताच मराठवाडा, विदर्भातील वैधानिक विकास महामंडळाच्या स्थापनेचा मुद्दा उपस्थित केला. वैधानिक विकास महामंडळाची पुनर्स्थापना का केली नाही? 72 दिवस झाले तरी सरकार काही करत नाही ? अशा प्रश्नांची सरबत्तीच त्यांनी केली आहे.
दरम्यान, याच मुद्द्यावरून विरोधकांनी सभात्याग केला आहे. यानंतर, सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देखील दिली आहे. ‘भारतात सगळ्यात जास्त वाघ विदर्भात आहेत. विदर्भाच्या जनतेचा अपमान करू नका. सरकारचा निषेध करत आम्ही सभात्याग करतोय,’ असं भाष्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. ‘ या राज्यात मराठवाडा आणि विदर्भातील लोक राहतात, हे लक्षात ठेवा,’ असं म्हणत त्यांनी सरकारला फटकारलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- “ठाकरी बाणा” खुर्चीसाठी एवढा लाचार होऊ शकतो ?
- मोदीसाहेब, आता ‘माकडावस्थेत’ जाऊन झाडावरची पान फुल खाऊन जगावं की काय…?
- ‘युवकांनो, स्वच्छ राजकारणासाठी ‘वंचित’मध्ये सक्रिय व्हा’
- हिंगोली जिल्ह्यात आजपासून ७ मार्चपर्यंत संचारबंदी लागू; एसटीही बंद
- संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर आता चित्रा वाघ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

