औरंगाबाद : औरंगाबाद शहरात ३० मार्चपासून संपूर्ण लॉकडाऊन लावण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. प्रशासनाच्या या निर्णयाला औरंगाबादचे खा. इम्तियाज जलील यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. लॉकडाऊन विरोधात ते भव्य मोर्चा काढणार आहेत. मात्र प्रशासनानेही आता लॉकडाऊनची तारीख बदलली आहे.
३१ मार्च रोजी औरंगाबाद शहरात लॉकडाऊनच्या विरोधात खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी पैठणगेट येथून दुपारी तीन वाजता भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्याची घोषणा रविवारी पत्रकार परिषदेत केली होती. आता कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव खासदारांच्या समर्थनात मैदानात उतरले आहेत.
सोशलमिडीयावर एक व्हिडिओ व्हायरल करुन रायभान जाधव विकास आघाडीचे कार्यकर्ते व ते स्वतः मोर्चात सहभागी राहणार आहेत. एकीकडे मोठे उद्योग सुरु ठेवत, विमान कंपन्या नियमाचे पालन न करता आपला व्यवसाय करत आहे. दुसरीकडे छोटे उद्योग, हॉटेलचालक, ऑटोचालक, कामगार, पानटपरी, फळ विक्रेते यांचे उद्योग लॉकडाऊनमध्ये बंद करुन गरीबांचे हाल करत आहे.
अगोदरच कोरोनाच्या काळात आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. जनसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. जनसामान्यांच्या हक्कासाठी कोणी लढत असेल तर जातभेद विसरून साथ देण्याची गरज आहे. रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही. सर्व जाती धर्माचे लोकांनी मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- लॉकडाऊन बाबत राष्ट्रवादीमध्येच मतभेद ? नवाब मलिकांनी केला विरोध
- पुण्यात बेड्सची कमतरता, महापौरांनी घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय
- ‘शिवसेनेचे राऊत पवारांचा जप करतायत…महाराष्ट्राचं राजकारण आता किळसवाणं झालंय’
- औरंगाबादच्या लॉकडाऊन आदेशात जिल्हाधिकाऱ्यांनी केला बदल
- ‘त्या’ मारहाणीत ८५ वर्षाच्या महिलेचा मृत्यू ; अमित शाह संतापले

