Share

शिर्डीत शनिवारी ‘दार उघड उद्धवा दार उघड’ आंदोलन

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे : कोरोनाच्या काळात राज्यातील सर्व मंदिरे बंद होती. ती मंदिरे पुन्हा उघडी करावी या मागणीसाठी भाजपाच्या अध्यात्मिक आघाडीच्या वतीनं शनिवारी शिर्डी येथे ‘दार उघड उद्धवा दार उघड’ आंदोलन केलं जाणार आहे. शिर्डीमध्ये डॉ.सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होईल. भाजपाच्या कार्यकर्त्यांसह अध्यात्मिक आणि वारकरी संप्रदायातील कार्यकर्त्यांनी या घंटानाद आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी केले आहे.

याबाबत खा.सुजय विखे म्हणाले, राज्यातील इतर सर्व व्यवसाय सुरू करण्यास राज्य सरकारनं परवानगी दिली, मात्र मंदिरं खुली करण्याबाबत कोणताही निर्णय न घेतल्याने तिर्थक्षेत्रांच्या ठिकाणी असलेले व्यवसाय मागील पाच महिन्यांपासून बंद आहेत. शिर्डी येथील साईबाबांचे मंदिर बंद असल्याने येथील अर्थकारण ठप्प झाले असून व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याबाबत राज्य सरकारकडे वारंवार मागणी केली, तरीही मंदिर सुरू करण्यास राज्य सरकार दिरंगाई का करते? दारूच्या दुकानापासून ते मॉल उघण्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतात. मग, मंदिरांबाबतच वेळ काढू पणाचे धोरण का? असा सवाल खा.सुजय विखे यांनी उपस्थित केला आहे.

हा तालुक्यातील सामान्य जनतेवर अन्याय- आ.लहू कानडे

तुकाराम मुंढेंनी रोखलेली विकासकामे तत्काळ सुरू करा, या आमदारांची आहे मागणी

प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना दिलेल्या ३५ कोटींच्या धमकी प्रकरणी एकाला अटक

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!