Share

जिल्हा बँकेत बोर्डीकर गटाची बहुमताअभावीच रिंगणातून माघार,

Published On: 

परभणी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष – उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांना बहुमताअभावीच माघार घेतली आहे. या बाबत दिवसभर राजकारण्यांसह नागरिकांमध्ये चर्चा सुरु होती.
जिल्हा बँकेच्या या दोन्ही पदाच्या निवडीकरिता मंगळवारी अकरा वाजता जिल्हा बँकेत नवनिर्वाचित सदस्यांची विशेष सभा आयोजित केली होती. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे हे अध्यक्षस्थानी होते. सकाळी ११ वाजता अध्यक्ष – उपाध्यक्ष पदाकरिता अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यावेळी आमदार वरपुडकर, प्रेरणा वरपुडकर या दोघांनी अध्यक्षपदासाठी, राजेश पाटील गोरेगावकर यांनी उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता. निर्धारित वेळेत या दोन्ही पदाकरिता अन्य कोणीही अर्ज दाखल केला नाही. छानणी पाठोपाठ माघारीच्या प्रक्रियेत प्रेरणा वरपुडकर यांनी अर्ज मागे घेतला.
त्यामुळे अध्यक्षपदासाठी वरपुडकर व उपाध्यक्षपदासाठी गोरेगावकर या दोघांचा एकमेव अर्ज राहिला. पर्यायाने निवडणूक निर्णय अधिकार्यांनी या दोघांची बिनविरोध निवडीची घोषणा केली. या दोन्ही पदाच्या निवडीच्या बैठकीचे वैशिष्ट्य म्हणजे बोर्डीकर हे या बैठकीकीकडे फिरकले नाहीत. न्यायालयीन आदेशामुळेच ते बैठकीपासून दूर राहिले.तर आमदार दुर्राणी हेही या सभेकडे फिरकले दिसले नाही. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानातील गुफ्तगुनंतर दुर्राणी यांनी बैठकीऐवजी पाथरी गाठण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांचे कट्टर समर्थक नवनिर्वाचित संचालक दत्ता मायंदळे हेही त्यांच्यासोबत पाथरीकडे रवाना झाले.
या विशेष सभेस आमदार मेघना साकोरे – बोर्डीकर, आमदार तानाजी मुटकुळे, भगवान सानप, आनंद भरोसे, भावना कदम बोर्डीकर, माजी खासदार अॅड. शिवाजी माने हे उपस्थित होते. या व्यतिरीक्त आमदार वरपुडकर, माजी आमदार साहेबराव पाटील गोरेगावकर, आमदार राजू नवघरे, माजी आमदार सुरेश देशमुख, भगवान वाघमारे, प्रेरणा वरपुडकर, राजेश पाटील गोरेगावकर, राजेश विटेकर, अतुल सरोदे, बालाजी देसाई, गणेश रोकडे, पंडीत चोखटसह आदींची उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या :  

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!