Share

लातूर अर्बन बँकेचे ‘अच्छे दिन’, १७ कोटी २८ लाखांचा नफा

Published On: 

🕒 1 min read

लातूर: दि लातूर अर्बन को-ऑप बँक लि. लातूर या महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या बॅँकेला मार्च-२०२१ अखेर१७ कोटी २८ लाखांचा नफा झाला आहे. बँकेच्या मुख्यालय व १६ शाखा लातूर, पुणे, मुंबई, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर व अहमदनगर येथे कार्यरत आहेत. या भागातील गरजवंतांना कर्ज पुरवठा करण्यात बँक अग्रेसर राहिली आहे.

बँकेच्या स्थापनेपासून सरकारी बँका व खाजगी बँकाच्या प्रमाणात संगणक प्रणाली व जे जे नव नवीन अद्ययावत तंत्रज्ञान ग्राहकाला उपयुक्त ठरेल अशा सर्व सुविधा या बँकेने स्वीकारल्या आहेत. उच्चशिक्षित, उद्योजक, व्यापारी तसेच एकूण ७ सि. ए. संचालक मंडळात सदस्य म्हणून काम पाहत आहेत. त्यामुळे बँकेचा कारभार रिझर्व्ह बँकेच्या मापदंडानुसार व पारदर्शकपणे होत आहे. आज बँकेच्या स्थापनेला २५ वर्ष पूर्ण झाले असून, आजपर्यंत बँकेला ऑडिटचा ‘अ’ दर्जा प्राप्त आहे.

त्याच प्रमाणे मार्च २०२० अखेर बँकेची आर. बी. आय. तपासणी झाली. बँकेच्या कामकाजावर समाधान व्यक्त केले आहे. बँकेची दि. ३१ मार्च २०२१ रोजी अखेर एकूण ठेवी ५८२ कोटी व कर्ज वाटप ३९८ कोटी असून बँकेचा निव्वळ एन. पी. ए. २.९७ टक्के राहिला आहे. बँकेचा एकूण व्यवसाय १००० कोटींच्या पुढे झाला आहे. बँकेच्या पुढील वर्षासाठी ठेवीचा इष्टांक ७०० कोटी, कर्ज वाटप ४७५ कोटी व एन. पी. ए. शून्य टक्के ठेवण्याचे निश्चित केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!