Share

विदर्भातील ‘या’ भाजपच्या आमदाराचे मुख्यमंत्र्यांना खुले पत्र…. वाचा काय लिहिले आहे ते

Published On: 

चंद्रपूर : गोसीखुर्द धरणातून पाण्याच्या सतत विसर्गामुळे वैनगंगा नदीस पूर आला. या महापुरामुळे चंद्रपूर-गडचिरोली जिल्हय़ात झालेल्या अतोनात नुकसानीच्या तत्काळ सर्वेक्षणासाठी विशेष पथक नेमण्यात यावे. शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. पूरग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडिया यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

चिमूर विधानसभा क्षेत्रासह समावेश असलेल्या चंद्रपूर-गडचिरोली जिल्हय़ाची धमनी रक्तवाहिनी (लाईफ लाईन) असलेल्या वैनगंगा नदीत गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पातून पाण्याच्या सतत विसर्गामुळे मागील २५ वर्षांत न पाहिलेला अतिविशाल विनाशकारी महापूर ३० ऑगस्टपासून सर्वसामान्य जनता अनुभवते आहे. आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांनी प्रशासन व लोकप्रतिनिधींसोबत ३१ ऑगस्ट रोजी ब्रम्हपुरी तालुक्यातील पूरग्रस्त भागात लाईफबोटीने केलेल्या पाहणी दौर्‍यातील अनुभवाच्या आधारे विशेष बाबी महाराष्ट्र सरकारच्या लक्षात आणून दिल्या आहेत.

शिवसेनेने धोका दिला ; काँग्रेस नेत्याचा घणाघात

चिमूर विधानसभा क्षेत्राच्या वैनगंगा नदीपात्रातील शेतीसह चंद्रपूर गडचिरोली जिल्हय़ाच्या वैनगंगा नदीस जोडलेल्या लहान मोठय़ा नद्यांना सर्वत्र महापूर आल्याने सर्वच जनजीवन विस्कळीत झाले आहे. वैनगंगा नदीपात्रासह खोलगट भागातील नदीस जोडलेल्या लहान मोठय़ा सर्व नदी नाल्यांना सर्वत्र महापूर आल्याने शेतीची अत्यंत हानी झाली आहे. बॅकवाटरमुळे सर्वत्र पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. चंद्रपूर गडचिरोली जिल्हय़ात गोरगरीब शेतकर्‍यांचे मुख्य पीक असलेला भात यासह संततधार पावसाने कापूस, सोयाबीन तूर, मका, भाजीपाला व फळ भाज्यांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

आदर्शगाव हिवरे बाजारची स्वतंत्र कोरोना नियमावली

युद्धजन्य अशा परिस्थितीत उपजीविकेचा प्रश्न उभा ठाकला आहे. वैनगंगेच्या महापुरात कधी नव्हे असे सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाल्यान युद्धपातळीवर उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनाने तत्काळ सर्वेक्षणास विशेष पथक नेमावे. नुकसान झालेल्यांना आर्थिक मदत, पिण्याचे पाणी, अन्न, धान्य, वस्त्र, निवारा, रोजगार, रस्त्यांच्या दुरुस्ती बांधकामासह अखंडित विद्युत पुरवठा, संपर्क व्यवस्था पूर्ववत निर्माण होण्यासाठी अविलंब त्वरित कारवाई करावी, अशी मागणी आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भातील पत्र ३१ ऑगस्ट रोजी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.

कंगना राणावतने केलेला मुंबई पोलिसांचा अपमान सहन करणार नाही: निलेश राणे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!