मुंबई: महाराष्ट्र सरकार आरे जंगलातच कारशेड रचण्याचं षडयंत्र आखत आहे, 600 एकर जंगल घोषित करून कारशेड वेगळं करण्यात आलं आहे. शहरामध्ये जंगल आणि जंगलात कारशेड हा कसला विकास मॉडेल? असा प्रश्न विचारत शिवसेनेने आम्हाला धोका दिला असं ट्विट काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी केलं आहे. यावरून आता शिवसेना आणि काँग्रेस आमनेसामने येण्याची शक्यता आहे. याआधीही निरुपम यांनी सरकारवर टिका केलेली आहे, म्हणून यावर काँग्रेसची अधिकृत भूमिका काय येते हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे.
मागील भाजप सरकारच्या सत्ताकाळात मुंबईत आरे जंगलात मेट्रोचे कारशेड बनवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर त्याचं प्रत्यक्षात काम सुरू झाल्यावर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे म्हणून अनेक पर्यावरणप्रेमींनी तिथे आंदोलन सुरू केले होते. तरीही काही झाडांची कत्तल केली गेली होती म्हणून त्यावेळी शिवसेनेनेसुद्धा आवाज उठवला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कारशेड प्रकल्पाला तात्पुरती स्थगिती दिली होती. पण महाराष्ट्रात सत्ताबदल झाल्यानंतर आरे कारशेडची जागा बदलण्यात येईल असा अंदाज पर्यावरणप्रेमी व्यक्त करत होते. सद्या मात्र तस काही होताना दिसत नसल्याचे संजय निरुपम यांच्या आरोपांवरून स्पष्ट होत आहे.
आदर्शगाव हिवरे बाजारची स्वतंत्र कोरोना नियमावली
सरकार ने कल #Aarey में 600 एकर इलाका संरक्षित जंगल घोषित किया है।
पर वहाँ प्रस्तावित #MetroCarShed अलग कर दिया है।
यह शिवसेना का धोखा है और उसी जगह पर कार शेड का काम जारी रखने का एक षडयंत्र है।
शहर के बीच में जंगल और जंगल के बीचोंबीच मेट्रो स्टेशन !
यह विकास का कैसा मॉडल है ?— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) September 3, 2020
आता काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्या या वक्तव्यावरुन सरकारमधील संबंध ताणले जाऊ शकतात. त्यामुळे, या मुद्द्याकडे मुंबईकरांचे लक्ष लागून आहे. आता सत्ताधारी शिवसेना आणि काँग्रेस यावर काय भूमिका घेतात याची उत्सुकता आहे.
कंगना राणावतने केलेला मुंबई पोलिसांचा अपमान सहन करणार नाही: निलेश राणे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

