अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- अहमदनगर जिल्ह्यात लॉकडाउनच्या नियमांमध्ये नुकतीच शिथिलता जिल्हाधिकारी राहुल द्विवेदीे यांनी मंगळवारी आणली आहे. त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा, दुकाने आता सकाळी नऊ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत उघडे ठेवण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. मात्र असे असले तरी देशात प्रसिद्ध असलेले नगर तालुक्यातील आदर्शगाव हिवरे बाजारने स्वतःची स्वतंत्र कोरोना नियमावली तयार केली आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तसेच आपल्या गावातील नागरिकांचे आरोग्य जपण्यासाठी हिवरे बाजार गावाने ही नियमावली केली आहे. त्यानुसार हिवरे बाजार गावातील किराणा दुकाने सकाळी ७ ते १२ व दुपारी ३ ते ५ यावेळेत उघडे राहणार आहेत. तसेच गावातील सर्व दुकानात सोशल डिस्टंसिंगचे पालन काटेकोरपणे करणे गरजेचे आहे, असे ग्रामसुरक्षा समितीने म्हटले आहे.
कंगना राणावतने केलेला मुंबई पोलिसांचा अपमान सहन करणार नाही: निलेश राणे
तसेच गावातील मालवाहतूक करणारे वाहन चालक यांना स्वतःची कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे. गावातील दूध डेअरींना सकाळी ७ ते ८ व सायंकाळी ७ ते ८ या वेळेतच दूध संकलन करण्याची परवानगी आहे. तसेच गावातील सलूनची दुकाने ३० सप्टेंबर २०२० पर्यंत पूर्णतः बंद राहणार आहेत. तसेच गावात प्रत्येकाने मास्क व सॅनिटायझर वापरणे बंधनकारक आहे, असे ग्रामसुरक्षा समितीने म्हटले आहे.
राजीव गांधींच्या नावाने नाही तर महान खेळाडूच्या नावाने दिला जावा खेलरत्न पुरस्कार-बबिता फोगाट


