Share

कंगना राणावतने केलेला मुंबई पोलिसांचा अपमान सहन करणार नाही: निलेश राणे

Published On: 

मुंबई : १४ जून रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाला. त्याच्या अचानक जाण्याने चहत्यांसह बॉलिवूडला मोठा धक्का बसला होता. दरम्यान, त्याच्या घरच्यांनी यामध्ये घातपताची शक्यता व्यक्त केली होती. यानंतर या प्रकरणाने वेगळीच कलाटणी घेतली. कंगना राणावतने यामध्ये नेपोटीजम असून अनेक बड्या बॉलिवूड दिग्दर्शकांवर आरोप लावले होते.

यानंतर, भाजपाने बड्या व्यक्तीचे नाव समोर येण्याची शक्यता असल्याने महाविकास आघाडी सरकारकडून पोलिसांवर दबाव आणला जात आहे, असे आरोप लावत सीबीआय चौकशीची मागणी केली होती. यामुळे या प्रकरणावरून गेले २ महिने राजकारण रंगलेले पाहायला मिळाले.

राजीव गांधींच्या नावाने नाही तर महान खेळाडूच्या नावाने दिला जावा खेलरत्न पुरस्कार-बबिता फोगाट

काही दिवसांपूर्वी कंगना राणावतने एक वादग्रस्त ट्विट केले होते, ज्यामध्ये मला बॉलिवूड माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते अशी टीका केली होती. यानंतर नेटिझन्सने तिला चांगलेच धारेवर धरल्याचे दिसून आले.

प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारला कोरोनाची लागण

दरम्यान, यानंतर आता भाजपा नेते निलेश राणे यांनी देखील कंगना राणावतचा चांगलाच समाचार घेतला असून मुंबई पोलिसांचा अपमान सहन करणार नाही, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. ” 2/3 अधिकारी प्रेशर मध्ये आले म्हणजे संपूर्ण पोलीस डिपार्टमेंट दोषी होत नाही. आम्हाला महाराष्ट्र पोलिसांवर अभिमान आहे. मुंबई पोलिसांवर बोलण्या इतकी राणावत कोण लागून गेली?? SSR आणि सालियान प्रकरणात खरे आरोपी पकडण्याच्या समर्थनात आम्ही आहोत पण आमच्या पोलिसांचा अपमान सहन करणार नाही.” असे ट्विट त्यांनी केले आहे.

३० सप्टेंबर पर्यंत विठ्ठल रुक्मिणी मंदिर बंद ठेवण्याचा मंदिर समितीचा निर्णय…

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!